- सुजित महामुलकर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री (former chief minister) अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा (primary membership) तसेच आमदारकीचा (MLA post) आज सोमवारी १२ फेब्रुवारीला राजीनामा दिला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या कुठल्याही नेत्यावर आरोप केला नाही मात्र त्यांनी राज्यातील एका नेत्याच्या कार्यशैलीवर नाराज होऊन हे पाऊल उचलल्याचे चर्चा पक्ष नेत्यांमध्ये उघडपणे होताना दिसून येत आहे. हा नेता कोण? (Ashok Chavan)
नाना पटोले यांच्याकडे अंगुलीनिर्देश
काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी थेट नाव न घेता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे अंगुलीनिर्देश केल्याचे स्पष्ट होत आहे. निरुपम यांनी केलेले X वरील पोस्ट पुरेशी बोलकी आहे. (Ashok Chavan)
.. तर ही परिस्थिती उद्भवली नसती
त्यात निरुपम म्हणतात, “अशोक चव्हाण हे पक्षासाठी निश्चितच ‘ऍसेट’ (Asset) होते. कोणी त्याला ‘लायबिलिटी’ (Liability) म्हणत आहेत, कोणी ईडीला (ED) जबाबदार धरत आहेत, ही सर्व उतावीळ प्रतिक्रिया आहे. मुळात महाराष्ट्रातील एका नेत्याच्या कार्यशैलीवर ते खूप नाराज होते. याची माहिती त्यांनी वेळोवेळी वरिष्ठ नेतृत्वाला दिली होती. त्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती. (Ashok Chavan)
(हेही वाचा – Farmers Protest : शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीतील सुरक्षा वाढवली)
भरपाई कोणीही करू शकणार नाही
त्यांनी पुढे म्हटले आहे: “अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे साधनसंपन्न, कुशल संघटक, सामान्य कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेले आणि मतदारांमध्ये पकड असलेले आणि गांभीर्याने काम करणारे नेते आहेत. गेल्या वर्षी जेव्हा भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये (Nanded) पाच दिवसांची होती, तेव्हा संपूर्ण नेतृत्वाने त्यांची क्षमता प्रत्यक्ष पाहिली होती. त्यांचे काँग्रेस सोडणे हे आमचे मोठे नुकसान आहे. त्याची भरपाई कोणीही करू शकणार नाही. त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आमचीच होती.” (Ashok Chavan)
चव्हाणसुध्दा काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?
याउलट शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चव्हाण यांच्यावर खोचक टीका करत चव्हाण सुद्धा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? असा सवाल केला. त्यांनी X वर पोस्ट केली: “अशोक चव्हाण भाजपवासी (BJP) झाले. विश्वास बसत नाही. काल पर्यंत ते सोबत होते.. चर्चा करीत होते.. आज गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते!” (Ashok Chavan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community