- ऋजुता लुकतुके
स्पाईसजेट ही भारतीय विमान कंपनी १५ टक्के नोकर कपातीच्या विचारात असल्याचं समजतंय. जवळ जवळ १,४०० कर्मचाऱ्यांना येत्या महिन्यांत नारळ देण्यात येणार आहे. सध्या कंपनीकडे ३० विमानं आणि ९,००० कर्मचारी आहेत. विमानांपैकी ८ ही परदेशी विमान कंपन्यांना भाड्याने देण्यात आली आहेत. या भाड्याने दिलेल्या विमानांची देखभाल आणि ऑपरेशन स्पाईसजेटकडूनच पाहिलं जातं. त्यामुळे तिथे कंपनीचे काही कर्मचारी लागलेले आहेत. (SpiceJet Job Cut)
Job Cuts At Spicejet: Airline To Layoff 1,400 Employees https://t.co/s9koHQDxCS #Spicejet
— Oneindia News (@Oneindia) February 12, 2024
(हेही वाचा – BMC : एमएमआरडीएची आपल्या हद्दीतील खर्च देण्यास असमर्थता, मुंबई महापालिकेचा हा प्रकल्प रखडणार)
हा खर्च कमी करण्यासाठी नोकर कपात
कंपनी कर्मचाऱ्यांना देत असलेल्या पगाराचं बिल सध्या ६० कोटी रुपये इतकं आहे. जानेवारी महिन्यातील कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले आहेत. आणि यापूर्वीही कंपनी वेळेवर पगार देत नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. अशावेळी २,२०० कोटी रुपयांचं नवीन भांडवल गुंतवण्यापूर्वी कंपनीला ही पगाराची रक्कम थोडीफार कमी करायची आहे. (SpiceJet Job Cut)
२०१९ मध्ये म्हणजे कोव्हिड पूर्वी कंपनी पूर्ण क्षमतेनं काम करत होती. आणि तेव्हा कंपनीकडे ११८ विमानं आणि १६,००० च्या वर कर्मचारी संख्या होती. पण, कोव्हिडनंतर बिघडलेलं आर्थिक गणित अजूनही नीट होत नाहीए. अनेक विमान कंपन्यांची हीच तक्रार आहे. अशावेळी ऑपरेशनल खर्च कमी करण्यासाठी नोकर कपात ही पहिली उपाययोजना कंपनी करणार आहे. (SpiceJet Job Cut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community