अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को इथं एका विचित्र घटनेत गुगलच्या अल्फाबेट कंपनीची वेमो ही स्वयंचलित कार जमावाने अडवून पेटवून दिली. या कारवर लोकांनी हल्ला केला आणि नंतर ती पेटवण्यात आली. एखाद्या खाजगी गाडीवर झालेला अमेरिकेतील हा सगळ्यात भयानक हल्ला मानला जातोय. (Self-Driven Car Set on Fire)
शहरात तेव्हा चिनी नववर्ष साजरं केलं जात होतं. कॅलिफोर्नियामधील चायनाटाऊनमध्ये जमाव त्यासाठीच जमला होता. अशावेळी रस्त्यावरून वेमोची एसयुव्ही गाडी जात होती. पांढऱ्या रंगाच्या या कारवर जमाव चाल करून गेला. मायकेल वँडी या प्रत्यक्षदर्शीने रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, ‘एक माणूस गाडीच्या टपावर जाऊन बसला आणि त्याने विंडशिल्ड तोडलं. इतक्यात दुसऱ्याने गाडीच्या पुढच्या भागावर हल्ला केला. लोक त्यांच्यासाठी चिअर करत होते.’ (Self-Driven Car Set on Fire)
Crowd sets Waymo self-driving car ablaze in San Francisco https://t.co/lbM82uVXgs pic.twitter.com/RvzTrw4WXA
— Reuters (@Reuters) February 11, 2024
(हेही वाचा – CM Eknath Shinde : धाराशिव येथे ५०० बेड्सचे सुसज्ज रुग्णालय उभारणीची कार्यवाही करा)
…तेव्हापासून लोक स्वयंचलित गाड्यांवर चिडले
त्यानंतर जमावापैकी कुणीतरी पेटलेले फटाके गाडीत टाकले. आणि त्यामुळे गाडीने पेट घेतला. हे दृश्य सोशल मीडियावरील व्हिडिओत दिसत आहे. सुदैवाने गाडीत प्रवासी नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली. सॅनफ्रान्सिस्को पोलीस या प्रकाराची चौकशी करत आहेत. पण, सध्या लोकांचा स्वयंचलित गाड्यांवरील राग उघडपणे व्यक्त होताना दिसत आहे. गेल्यावर्षाच्या शेवटी जनरल मोटर्स कंपनीची एक कार अपघाताने रस्ता सोडून शेजारच्या फुटपाथवर गेली होती. या अपघातात एकाचा मृत्यूही झाला होता. तेव्हापासून लोक स्वयंचलित गाड्यांवर चिडलेले आहेत. (Self-Driven Car Set on Fire)
गेल्याच आठवड्यात एक वेमो कार सॅनफ्रान्सिस्को इथं एका सायकलस्वाराला धडकली होती. सुदैवाने यात सायकलस्वाराला फारशी इजा झाली नाही. वेमो कार फिनिक्स भागात भाड्याने देण्यात येते. आणि कंपनीला आपली सेवा लॉस एंजलिस, ऑस्टिन आणि इतर काही शहरात वाढवायची आहे. (Self-Driven Car Set on Fire)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community