- ऋजुता लुकतुके
अलीकडे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत आपली छाप उमटवलेला शेमार जोसेफ आगामी आयपीएलमध्ये लखनौ सुपरजायंट्सकडून खेळणार आहे. इंग्लिश तेज गोलंदाज मार्क वूडला इंग्लिश बोर्डाने आयपीएलसाठी परवानगी नाकारल्यानंतर बदली खेळाडू म्हणून लखनौ फ्रँचाईजीने शेमारला पसंती दिली आहे. शेमारला यामुळे ३ कोटी रुपयांची लॉटरीही लागली आहे. (IPL 2024)
Shamar, we’re so happy to have you 💙🔥@SJoseph70Guyana joins our squad for IPL 2024, replacing Mark Wood 🤝 pic.twitter.com/YPfGQZB18N
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) February 10, 2024
(हेही वाचा – Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे नेते भगवंत मान यांनी घेतले रामलल्लाचे दर्शन)
वूडला लखनौ फ्रँचाईजीने ‘इतके’ कोटी रुपये देऊन घेतलं विकत
आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये होणारी वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका लक्षात घेऊन मार्क वूडला आयपीएलसाठी परवानगी नाकारण्यात आल्याचं समजतंय. अलीकडेच इंग्लिश बोर्डाने जोफ्रा आर्चरलाही आयपीएल साठीच्या लिलावात सहभागी होण्यापासून रोखलं होतं. (IPL 2024)
आर्चर दुखापतीतून सावरतोय. आणि अशावेळी टी-२० विश्वचषकाला त्याने प्राधान्य द्यावं असं इंग्लिश बोर्डाचं म्हणणं होतं. लखनौ फ्रँचाईजीने २०२२ च्या हंगामात वूडला ७.५ कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं. पण, गेल्यावर्षीही कोपराच्या दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता. त्यानंतर २०२३च्या हंगामात त्याने ११.०७ च्या सरासरीने ११ बळी टिपले होते. (IPL 2024)
(हेही वाचा – Self-Driven Car Set on Fire : अमेरिकेत जमावाने स्वयंचलित गाडी का पेटवली)
शेमार क्रिकेटमध्ये उगवता तेज गोलंदाज
दुसरीकडे शेमार जोसेफने अलीकडेच यशस्वी कसोटी पदार्पण करून दाखवलं आहे. कसोटीत आपल्या पहिल्याच चेंडूंवर त्याने स्टिव्ह स्मिथचा बळी मिळवला. आणि दुसऱ्या ब्रिस्बेन कसोटीत तर त्याने ६३ धावांत ७ बळी मिळवत वेस्ट इंडिजला १९९६ नंतर ऑस्ट्रेलियात पहिला कसोटी विजय मिळवून दिला होता. (IPL 2024)
शेमार अजूनही टी-२० क्रिकेट फारसं खेळलेला नाही. फक्त २ सामने त्याच्या नावावर आहेत. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उगवता तेज गोलंदाज म्हणून त्याने नाव कमावलं आहे. (IPL 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community