- ऋजुता लुकतुके
रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेली कारवाई ही काही महिन्यांच्या अभ्यासानंतर केलेली आहे. त्यामुळे तिचा फेरआढावा शक्य नाही, या शब्दांत मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी पेटीएम कंपनीला सुनावलं आहे. सोमवारी उशिरा शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन पेटीएम बद्दलची भूमिका स्पष्ट केली. आणि ग्राहकांच्या हितासाठी मध्यवर्ती बँकेला हे पाऊल उचलावं लागलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. (Paytm Crisis)
रिझर्व्ह बँकेनं ३१ जानेवारीला पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई करताना ग्राहकांकडून नवीन ठेवी, मुदतठेवी, वॉलेट्स आणि फास्टटॅगमध्ये नवीन पैसे जमा करुन घेण्यावर प्रतिबंध घातले. आणि २९ फेब्रुवारीपर्यंत ग्राहकांना या बँकेतून फक्त पैसे काढून घेता येतील असंही आदेशात म्हटलं. (Paytm Crisis)
‘पेटीएमवर केलेल्या कारवाई विषयी बरंच बोललं जात असल्यामुळे रिझर्व्ह बँकेला आपली भूमिका पुन्हा एकदा मांडावी लागत आहे. या क्षणी मी हे स्पष्ट करु इच्छितो की, पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या कारवाईवर कुठलाही फेरविचार होणार नाही. सध्या घेतलेला निर्णय हा काही महिने कंपनीचं कामकाज पाहून घेतलेला निर्णय आहे. आणि तो ग्राहकांच्या हितासाठीच घेतलेला आहे,’ असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी ठणकावून सांगितलं. (Paytm Crisis)
(हेही वाचा – Brazil Out of Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमधून बलाढ्य ब्राझील आऊट)
“Let me be very clear that there is no review of the action taken against Paytm Payments Bank. The FAQ will deal with customer interest issues,” RBI
Governor Shaktikanta Dashttps://t.co/eDJWmbfQAT— Chandra R. Srikanth (@chandrarsrikant) February 12, 2024
या मधील पैसे काढून घेण्याची ग्राहकांना मुभा
रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची एक महत्त्वाची बैठक सोमवारी पार पडली. यात पेटीएमच्या मुद्यावरही चर्चा झाली. आणि तिथे झालेल्या चर्चेनंतरच शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी पत्रकार परिषद घेतली. बैठकीला अर्थमंत्री निर्मला सीतारमणही (Finance Minister Nirmala Sitharaman) उपस्थित होत्या. पेटीएम पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांसाठी नवीन माहिती प्रश्नोत्तराच्या स्वरुपात प्रकाशित केली जाणार आहे. आणि यात ग्राहकांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली असतील. (Paytm Crisis)
सात दिवसांत ही प्रश्नोत्तरे रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येतील, असं शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी सांगितलं आहे. पेमेंट्स बँकेला नवीन ठेवी स्वीकारण्यावर बंदी असली तरी बँकेत आधी असलेल्या ठेवी, वॉलेट आणि फास्टटॅगमधील पैसे काढून घेण्याची मुभा ग्राहकांना आहे. आणि त्यांच्या आधीच्या पैशावरील व्याज, रिफंड आणि कॅशबॅकही जमा होत राहणार आहे. (Paytm Crisis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community