हल्द्वानीच्या (Haldwani) बनभूलपुरा येथे ज्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम हटवण्यात आले, त्याच ठिकाणी पोलीस ठाणे बांधण्यात येणार आहे. देवभूमीच्या शांततेशी खेळणार्या कुणालाही सोडले जाणार नाही, हा आमच्या सरकारचा भ्रष्ट आणि दंगलखोर यांना स्पष्ट संदेश आहे. उत्तराखंडमध्ये अशा बदमाशांना जागा नाही, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी सुनावले आहे.
(हेही वाचा – Global Polarization : ध्रुवीकरण हा जागतिक स्तरावरील धोका; तज्ञांनी दिला इशारा)
5 हजार अज्ञात दंगलखोरांविरोधात गुन्हा दाखल
येथील अनधिकृत मदरसा हटवल्यानंतर धर्मांधांनी दंगल घडवली होती. यात ५ जण ठार, तर १०० हून अधिक पोलीस जखमी झाले होते. दंगलीनंतर उत्तराखंड पोलिसांनी 5 हजार अज्ञात दंगलखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओ क्लिप पाहून लोकांना ताब्यात घेतले जात आहे. परिसरात शांतता राखण्यासाठी उत्तराखंड पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवान ही तैनात करण्यात आले आहेत. (Haldwani)
या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका घेतली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community