Swati Mohol Threat Case : ससून आरोपी पलायन प्रकरणी दोन पोलीस कर्मचारी निलंबित

466
Swati Mohol Threat Case : ससून आरोपी पलायन प्रकरणी दोन पोलीस कर्मचारी निलंबित
Swati Mohol Threat Case : ससून आरोपी पलायन प्रकरणी दोन पोलीस कर्मचारी निलंबित

गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ धमकी प्रकरणातील आरोपी सायबर पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला आहे. ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता तो पळून गेला. या प्रकरणी हलगर्जी केल्यामुळे सायबर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. (Swati Mohol Threat Case)

(हेही वाचा – Hotels In Ayodhya : भविष्यात तुम्ही अयोध्येला जाणार असाल तर ‘या’ हॉटेल्सचा नक्की विचार करा)

स्वाती मोहोळ यांनी केली होती तक्रार

पोलीस शिपाई निखील अरविंद पासलकर आणि पोपट काळुसिंग खाडे असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत. मार्शल लुईस लिलाकर असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. धमकी दिल्याप्रकरणी स्वाती हिने पोलिसांकडे तक्रार दिली होती.

त्यानुसार आकुर्डी येथे रहाणारा मार्शल लिलाकर याला अटक करण्यात आली. त्याने मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने इन्स्टा खाते उघडून धमकी दिली होती. (Swati Mohol Threat Case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.