Uddhav Thackeray यांच्या धारावीतील सभेला मुस्लिम जमले की जमवले

उबाठा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी धारावीत शाखांना भेटी देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. धारावीत यानिमित्ताने आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये मोठ्याप्रमाणात मुस्लिम समुदाय दिसून आला. त्यामुळे मराठी बोलणाऱ्या उद्धव ठाकरे यांना अधून मधून हिंदीतून संवाद साधावा लागत होता.

360
Uddhav Thackeray : ‘मातोश्री’चा धाक गेला कुठे?
Uddhav Thackeray : ‘मातोश्री’चा धाक गेला कुठे?

शिवसेना दुभंगल्यानंतर आता उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शाखा भेटींना सुरुवात केली. मागील शनिवारी मुंबईतील पहिली शाखा भेट धारावीतून सुरु केली आहे. या शाखा भेटीच्या सभेत मोठ्याप्रमाणात मुस्लिम जनसमुदाय दिसून आला आहे. त्यानंतर उबाठा शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आमच्या पक्षाच्या मागे मुस्लिम समाज मोठ्याप्रमाणात असल्याचा दावा केला, परंतु धारावीमध्ये जमलेला हा मुस्लिम समाज शिवसेनेसाठी नव्हता तर धारावीतील आमदार आणि मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी जमवून दिला होता. त्यामुळे धारावीतील सभेत गर्दी दाखवण्यासाठी शिवसेनेला मुस्लिमांचा आधार घ्यावा लागल्याची चर्चा धारावीमध्ये ऐकायला मिळत आहे. (Uddhav Thackeray)

उबाठा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी धारावीत शाखांना भेटी देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. धारावीत यानिमित्ताने आलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभेमध्ये मोठ्याप्रमाणात मुस्लिम समुदाय दिसून आला. त्यामुळे मराठी बोलणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अधून मधून हिंदीतून संवाद साधावा लागत होता. परंतु या मुस्लिम समुदायाची जमलेल्या गर्दीवरून शिवसेनेने आता मुस्लिम समाज शिवसेनेकडे आकर्षित होऊ लागला आहे अशाप्रकारचा दावा करण्यास सुरुवात केली आहे. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा – Railway Minister Ashwini Vaishnav: वंदे भारत ट्रेनची परदेशात मागणी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती)

उद्धव ठाकरे यांची ही सभा धारावी बचाव करता

धारावीकरांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभेला जमलेला मुस्लिम समाज हा स्वत:हून आला नव्हता तर स्थानिक आमदार व मुंबई काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी पाठवलेला होता. धारावी बचाव करता सध्या उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाड हे एकत्र काम करत असून धारावीतील लोकांना मोठ्या घराचा लाभ मिळावा यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रयत्न करत आहेत, धारावीकरांचे धारावीत पुनर्वसन व्हावे यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रयत्नशील आहेत, अशाप्रकारचे काँग्रेसच्या आमदारांसह कार्यकर्त्यांनी स्थानिकांच्या मनात भरवून उद्धव ठाकरे यांची ही सभा धारावी बचाव करता असल्याचे सांगून प्रत्येक जनतेला घराच्या बाहेर काढले. यात मुस्लिम समाजाला भाजप विरोधात आणि घरांकरता ही सभा असल्याचे सांगून मुस्लिमांना या सभेसाठी जाण्यास सांगितले. मराठी लोकांपेक्षा मुस्लिमांना घराबाहेर काढणे सोपले असते. (Uddhav Thackeray)

मुस्लिम जनतेला बाहेर काढण्यामागे हेच एक कारण होते की मुस्लिम जनता निवडणुकीत शिवसेनेला मतदान करणार नाही पण पंजालाच करेल. तसेच मुस्लिम समाजाला भाजप (BJP) विरोधात राग असल्याने ते अन्य कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही याची खात्री असल्याने वर्षा गायकवाड यांनी मुस्लिम जनतेला बाहेर काढून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभेची गर्दी वाढवण्यास हातभार वाढवल्याची धारावीतील जनतेचे म्हणणे आहे. (Uddhav Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.