पंजाब, हरियाणातील २०० हून अधिक शेतकरी संघटनांच्या २० हजार शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे. शेतमालाला हमीभावासह विविध मागण्यांसाठी ‘चलो दिल्ली’चा नारा शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या मोर्चाला आवर घालण्यासाठी पोलिसांनाही शेतकऱ्यांवर अश्रूधुराचा (Farmers Protest In Delhi ) मारा करावा लागला.
पोलिसांवर दगडफेक करून प्रत्युत्तर
यामुळे आंदोलनस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला असून शेतकरी कोणत्याही परिस्थितीत माघार घेण्यास तयार नसल्यामुळे हा आंदोलनाचा वणवा आणखी पेटणार आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा पंजाबच्या अंबालात पोहोचताच पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकरी थांबले नाहीत. यामुळे पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. प्रत्युत्तरादाखल शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. शंभू बॉर्डरवर शेतकरी आणि पोलीस एकमेकांसमोर भिडले. पंजाब हरयाणातील लाखो शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. यामुळे दिल्लीच्या सीमांवर वाहतूक कोंडी झाली आहे. डीएनडी आणि चिल्ला बॉर्डरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
(हेही वाचा – Dadar Ranade Road हातगाड्यांनी अडवला; शुन्य नंबरच्या नावाखाली वाढल्या ‘या’ गाड्या)
2 वर्षांपूर्वी सरकारनं मान्य केलेल्या मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याने शेतकरी आक्रमक
2 वर्षांपूर्वी सरकारनं मान्य केलेल्या मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मान्य केलेल्या मागण्या अजूनही प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या नाहीत. एमएसपीच्या मुद्द्याकडे सरकार दुर्लक्ष करतंय असा आरोप करत संयुक्त किसान मोर्चानं दिल्लीकडे कूच केली आहे. दरम्यान शेतक-यांच्या 13 पैकी 10 मागण्या मान्य केल्याचा दावा केंद्र सरकारनं केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रलंबित 3 मागण्यांवर विचार करण्याचं आश्वासन सरकारने दिले आहे. लाखो शेतकरी दिल्लीकडे येत असल्यानं सरकारनंही जोरदार तयारी सुरू केलीय. दिल्लीच्या सीमेवर बॅरिकेट्स घालण्यात आलेत. खबरदारीचा उपाय म्हणून तारांचं कुंपणंही घालण्यात आले आहे. सिंघु, टिकरी बॉर्डरवर सीआरपीएफचे हजारो जवान तैनात करण्यात आले आहेत.
हेही पहा –