Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची लोकसभा निवडणुकीतून माघार?; काय आहे कारण ?

364
Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची लोकसभा निवडणुकीतून माघार?; काय आहे कारण ?
Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची लोकसभा निवडणुकीतून माघार?; काय आहे कारण ?

लोकसभा निवडणुकांची देशात मोठी तयारी चालू आहे. कॉंग्रेसनेही भारत जोडो न्याय यात्रा चालू आहे. अशातच कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी या लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे वृत्त आहे. सोनिया गांधी या सध्या उत्तर प्रदेशमधील रायबरेलीच्या खासदार आहेत. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या रायबरेली मतदारसंघातून प्रियांका गांधी आगामी लोकसभा निवडणूक (loksabha election 2024) लढवू शकतात.

(हेही वाचा – वंदे भारत ट्रेन आता परदेशातही धावणार!)

प्रियांका गांधी-वाड्रा निवडणूक लढवणार ?

प्रियांका गांधी-वाड्रा (Priyanka Gandhi-Vadra) गेल्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी राज्यभर काँग्रेसचा प्रचार केला होता. त्यामुळे सोनिया लोकसभेतून माघार घेण्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.

राजकीय पक्षांकडून एका बाजूला लोकसभेसाठी जय्यत तयारी चालू असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार, २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारांना १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.

राजस्थानमधील ३ जागांवर आणि हिमाचलमधील एका जागेवर राज्यसभेची निवडणूक होणार आहे. राजस्थानमधील दोन जागा भाजपाच्या खात्यात, तर एक जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. तसेच हिमाचलमधील जागाही काँग्रेसच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोनिया गांधी राजस्थान किंवा हिमाचलमधील जागेची निवड करू शकतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.