शिवसेना पक्षाचा आयकर विभागाच्या संबधित अधिकृत लॉगिन आयडी आणि पासवर्डचा ठाकरे गटाकडून गैरवापर केला जात असल्याच्या तक्रार अर्जाची दखल मुंबई पोलिसांकडून घेण्यात आली आहे. या अर्जाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (Financial Crime Branch) देण्यात आलेला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास प्राथमिक स्वरूपात असून या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.
(हेही वाचा – BMC : निवडणूक कामांसाठी अभियंत्यांनाही जुंपले, सेवा सुविधांसह पायाभूत प्रकल्पांच्या कामांवर होणार परिणाम)
शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी ३० जानेवारी रोजी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फनसळकर यांची मुंबई पोलीस मुख्यालयात भेट घेऊन पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी यांच्याकडून शिवसेना पक्षाच्या अधिकृत आयकर विभागाच्या संबंधित लॉगिन आयडी आणि पासवर्डचा बेकायदेशीररित्या गैरवापर केला जात असून शिवसेनेची फसवणूक होत असल्याचे अर्जात म्हटले होते, या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल (Financial Crime Branch) करण्याची मागणी अर्जात करण्यात आली होती.
(हेही वाचा – Chandrasekhar Agashe : स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणारे उद्योजक-चंद्रशेखर आगाशे )
मुंबई पोलिसांकडून या अर्जाची दखल घेण्यात आली असून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून या संदर्भात पुरावे गोळा करण्यात येत आहे.आर्थिक गुन्हे शाखेकडून (Financial Crime Branch) सायबर विभागाची मदत घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. प्राथमिक चौकशीत पुरावे आढळून आल्यास शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community