Abhishek Ghosalkar Case : जगाला दाखवून देण्यासाठी मॉरिसने फेसबुक लाईव्ह केल्याची शक्यता; अंगरक्षकाला न्यायालयीन कोठडी

गुन्हे शाखेने या प्रकरणात ४० जणांचे जबाब नोंदवले असून या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पथकाने मॉरिसचे सोशल मीडिया खाते तसेच त्याचे युट्युब खात्यावरील सर्च तपासले असता त्यात मॉरिस याने पिस्तुलचा वापर कसा करावा, तसेच पिस्तुल संदर्भात अनेक व्हिडीओ बघून त्यातून पिस्तुलचे प्रशिक्षण घेतले असल्याचे समोर आले.

576
Abhishek Ghosalkar Case : जगाला दाखवून देण्यासाठी मॉरिसने फेसबुक लाईव्ह केल्याची शक्यता; अंगरक्षकाला न्यायालयीन कोठडी

जगाला अभिषेक घोसाळकरची (Abhishek Ghosalkar Case) हत्या दाखवून द्यायची होती म्हणून मॉरिस याने या घटनेचे फेसबुक लाईव्ह केले असल्याची शक्यता गुन्हे शाखेला आहे, मात्र गुन्हे शाखेच्या हाती तसा कुठलाही पुरावा अद्याप लागलेला नाही. परंतु मॉरिसने हत्येपूर्वी युट्युबवर पिस्तुल चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणात ४० जणांचे जबाब नोंदवून या सर्व गुन्ह्याचा अहवाल तयार केला आहे. दरम्यान या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

(हेही वाचा – Chandrasekhar Agashe : स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणारे उद्योजक-चंद्रशेखर आगाशे )

अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस या दोघाचा मृत्यू –

बोरिवली पश्चिम येथील आयसी कॉलनी (Abhishek Ghosalkar Case) या ठिकाणी फेसबुक लाईव्ह दरम्यान मॉरिस नऱ्होना याने शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करून हत्या केली. त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (८ फेब्रुवारी) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस या दोघाचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मॉरिसने वापरलेली पिस्तुल अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याची असल्यामुळे त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

(हेही वाचा – Financial Crime Branch : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, आर्थिक गुन्हे शाखेकडून शिवसेनेच्या तक्रार अर्जाची दखल)

४० जणांचे जबाब नोंदवले –

गुन्हे शाखेने (Abhishek Ghosalkar Case) या प्रकरणात ४० जणांचे जबाब नोंदवले असून या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पथकाने मॉरिसचे सोशल मीडिया खाते तसेच त्याचे युट्युब खात्यावरील सर्च तपासले असता त्यात मॉरिस याने पिस्तुलचा वापर कसा करावा, तसेच पिस्तुल संदर्भात अनेक व्हिडीओ बघून त्यातून पिस्तुलचे प्रशिक्षण घेतले होते अशी माहिती समोर आली आहे. तसेच मॉरिसवर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले होते, त्याच्या ऑफिस जवळील २ हॉटेलचे जवळपास ७० ते ८० हजार रुपयाची उधारी होती असे देखील तपासत समोर आले आहे. मॉरिस हा पोकर गेम खेळण्यास एक्सपर्ट होता, पोकर खेळण्यासाठी मॉरिस हा खास लॉस एंजलिस (यु एस) येथील कॅसिनो मध्ये जात होता. २०२२ मध्ये त्याच्यावर दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर मॉरिस हा पूर्णपणे खचला होता, व स्वतःला निर्दोष दाखविण्यासाठी तुरुंगातुन बाहेर आल्यानंतर त्याने परिसरात स्वतःचे निर्दोष असल्याचे बॅनर लावले होते. परंतु अभिषेक याने ते बॅनर काढल्यामुळे त्याचा एक राग मॉरिसला होता अशी माहिती समोर आली. (Abhishek Ghosalkar Case)

(हेही वाचा – CM Yogi Adityanath यांनी केली ज्ञानवापीच्या तळघरात पूजा)

हत्येचे लाईव्ह प्रेक्षपण –

जगाला अभिषेश घोसाळकर यांची हत्येचे लाईव्ह प्रेक्षपण दाखवायचे असल्यामुळे मॉरिसने फेसबुक लाईव्ह केल्याची शक्यता पोलीसांना असून या अनुषंगाने तपास सुरू आहे. दरम्यान या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला मॉरिस चा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राची पोलीस कोठडी मंगळवारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुमावली आहे. (Abhishek Ghosalkar Case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.