Pulwama attack : पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानच्या जिहादी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या बसवर हल्ला केला होता. यात ४० जवानांना हौतात्म्य आले होते.

266
Pulwama attack : पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा (Pulwama attack) येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या जिहादी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हौतात्म्य पत्करणाऱ्या वीर जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रद्धांजली वाहिली. या भ्याड हल्ल्याला आज ५ वर्ष पूर्ण झाले असून त्याच्या दुःखद आठवणींचे स्मरण असल्याचे पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हंटले आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi यांनी केली ‘सूर्य घर मोफत वीज योजने’ ची घोषणा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi सध्या युएई दौऱ्यावर असून तेथील हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील. यादरम्यान, त्यांनी ट्विट करुन पुलवामा हल्ल्यातील (Pulwama attack) शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले की,

पुलवामा हल्ल्यात (Pulwama attack) शहीद झालेल्या शूर वीरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांची सेवा आणि आपल्या देशासाठीचे त्यांचं बलिदान नेहमीच स्मरणात राहील, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे. पंतप्रधानांसोबतच इतरही अनेक मंत्र्यांनी ट्विट करुन पुलवामा हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहिली आहे.

(हेही वाचा – Ind vs Eng 3rd Test : तिसऱ्या कसोटीत ध्रुव जुरेल आणि सर्फराझ यांचं पदार्पण जवळ जवळ निश्चित)

पुलवामा हल्ला –

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा (Pulwama attack) येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानच्या जिहादी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या बसवर हल्ला केला होता. यात ४० जवानांना हौतात्म्य आले होते. या भ्याड हल्ल्यामागे पाकपुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या जिहादी दहशतवादी संघटनेचा हात होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधल्या बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.