संन्यस्त जीवन जगूनही ज्यांनी प्रचंड मोठे धर्मकार्य केले, विविध धर्मग्रंथांवर अनेक दशके भावपूर्ण विवेचन करून हिंदूंच्या अनेक पिढ्यांना ज्यांनी धर्मशिक्षित केले ते प.पू. स्वामी गोविंद देवगिरि महाराज! समस्त हिंदूंच्या श्रद्धा ज्या श्रीराममंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) ठायी जोडलेल्या आहेत, त्या श्रीराममंदिराचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरि महाराज यांचा अमृत महोत्सव! १४ फेब्रुवारी रोजी दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मानपत्र आणि भेटवस्तू देऊन स्वामीजींचा सन्मान करण्यात आला. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने व्यासपिठावर ५ सुवासिनींनी प.पू. स्वामी गोविंद देवगिरि महाराज यांचे औक्षण केले. (Govind Dev Giri Ji Maharaj)
(हेही वाचा – BAPS Hindu Temple: अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण)
या वेळी व्यासपिठावर विधानपरिषदेच्या उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे, आमदार आणि भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर, भाजपचे आमदार अधिवक्ता आशिष शेलार, खासदार राहुल शेवाळे, ‘सुदर्शन न्यूज’चे संपादक सुरेश चव्हाणके, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि हिंदु जनजागृती समितीचे (Hindu Janajagruti Samiti) राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने स्वामीजींच्या भव्य आणि दिव्य कार्याप्रती कृतज्ञता म्हणून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
असा झाला कार्यक्रम !
राष्ट्रगीत आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत यांनी कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘सकल जगामध्ये छान, आमचे प्रियकर हिंदुस्तान’ हे गीत सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. त्यानंतर संतांचा सन्मान आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली. ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचे प्रकाशन !
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) लिखित ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
गांधी हत्येनंतर मोठ्या प्रमाणावर नरसंहार झाला. एक राजकीय प्रवाहाला संपवून दुस-या एका परिवाराला पुढे आणले गेले. तत्कालीन परिस्थितीत योग्य तपास झाला नाही. अनेक ठिकाणी तपासात त्रुटी राहिल्या. यामागे काय कारणे होती? अशा विविध अंगाने या पुस्तकात लिखाण करण्यात आले आहे. खोलवर संशोधन करून हे लिखाण करण्यात आले आहे, असे मनोगत रणजित सावरकर यांनी व्यक्त केले. (Govind Dev Giri Ji Maharaj)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community