‘यूएई (UAE)च्या भूमीने मानवी इतिहासाचा सुवर्ण अध्याय लिहिला आहे. हे मंदिर जगासाठी उदाहरण आहे. यात सर्वात मोठे योगदान माझे बंधू शेख झायेद यांचे आहे.’, असे उद्गगार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी अबुधाबी येथील २७ एकरांवर पसरलेल्या पहिल्या हिंदु मंदिराच्या लोकार्पणानंतर केलेल्या भाषावेळी काढले. यावेळी मंदिराच्या प्रांगणात उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित केले. (BAPS First Hindu Temple)
यावेळी उपस्थित समुदायाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, राष्ट्रपती नाह्यान यांनी क्षणाचाही वेळ न दडवता मंदिराच्या प्रस्तावाला होकार दिला. तुम्ही ज्या जमिनीवर म्हणाल ती जमीन मी तुम्हाला देणार, असा शब्दही त्यांनी दिला.
तसेच यूएईच्या राष्ट्रपतींनी करोडो भारतीयांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत, असे सांगताना मोदी म्हणाले की, त्यांनी १४० कोटी भारतीयांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. त्यांनी केलेल्या कामासाठी ‘धन्यवाद’ हा शब्द खूपच लहान वाटतो. २०१५ मध्ये यूएईला आलो होतो तेव्हा शेख मोहम्मद झायेद यांच्याकडे भारतातील लोकांच्या शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या. मंदिरासाठी एवढी मोठी जमीनही त्यांनी उपलब्ध करून दिली . २०१८ मध्ये पुन्हा इथे आलो तेव्हा मला मंदिराचे दोन मॉडेल दाखवण्यात आले. एक मॉडेल भारतातील वैदिक शैलीतील मंदिराचे होते, तर दुसरे सामान्य होते. त्यावर हिंदू चिन्हे नव्हती. हा प्रस्ताव शेख झायेद यांच्याकडे गेल्यावर त्यांनी सांगितले की, यूएईमध्ये बांधलेले मंदिर पूर्ण अभिमानाने आणि भव्यतेने बांधले जावे. ते नुसते मंदिर नसावे, तर मंदिरासारखे दिसावे.
(हेही वाचा – BMC Recruitment : महापालिकेतील ६६४ अभियंत्यांची पदे भरण्यासाठी लवकरच निघणार जाहिरात)
आगामी काळात मोठ्या संख्येने भाविक येतील (BAPS First Hindu Temple)
असे सांगून ते पुढे म्हणाले की, आतापर्यंत बुर्ज खलिफा, शेख झायेद मशीद आणि इतर हायटेक इमारतींसाठी ओळखल्या जाणाऱ्या युएईमध्ये आता आणखी एका सांस्कृतिक स्थळाची भर पडली आहे. आगामी काळात मोठ्या संख्येने भाविक येतील, असा मला विश्वास आहे. यामुळे लोकांशी संपर्क वाढेल. करोडो भारतीयांच्या वतीने मी राष्ट्रपती आणि यूएई सरकारचे मनापासून आभार मानतो. मी प्रार्थना करतो की, आपण सर्वांनी येथून यूएई (UAE) च्या राष्ट्रपतींना उभे राहून अभिवादन करावे.
स्वामीजींशी माझे नाते ‘पिता-पुत्रा’चे
मंदिराचे स्वप्न साकार झाल्याविषयी मानवतेच्या चांगल्या भविष्यासाठी वसंत ऋतुचे स्वागत करेल. हे मंदिर संपूर्ण जगासाठी जातीय सलोखा आणि जागतिक एकतेचे प्रतीक बनेल, अशी आशा मोदींनी व्यक्त केली. या मंदिरासंदर्भातील आठवणीविषयी ते म्हणाले की, आज यूएईच्या भूमीने मानवी इतिहासाचा नवा सुवर्ण अध्याय लिहिला आहे. यामागे अनेक वर्षांची मेहनत आहे. याला एक वर्ष जुने स्वप्न जोडले आहे. त्यात भगवान स्वामी नारायण यांचा आशीर्वाद आहे. आज प्रमुक स्वामींचा दिव्य आत्मा जगात कोठेही असला तरी त्यांना आनंद वाटत असेल. पूज्य प्रमुख स्वामीजींशी माझे नाते हे एक प्रकारे पिता-पुत्राचे नाते होते.
सहिष्णुता मंत्री शेख नह्यान बिन मुबारक
यांनी पंतप्रधान मोदींचे यूएईमध्ये स्वागत केले. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधानांचे स्वागत करताना आम्हाला अभिमान वाटतो. दोन्ही देशांमधील संबंध काळाच्या ओघात दृढ होत आहे. विकास सर्वांचा झाला पाहिजे, असे तुम्ही म्हणता. आम्ही यासोबत पूर्णपणे सहमत आहोत आणि त्यामुळेच दोन्ही देश विकासाच्या मार्गावर एकत्र चालत आहेत.
वॉल ऑफ हार्मनी
यावेळी पंतप्रधानांनी संपूर्ण मंदिराची भ्रमंती केली. इथल्या प्रत्येक वस्तू आणि कलाकृती त्यांनी पाहिल्या आणि त्यांची माहिती घेतली. बीएपीएस संस्थेचे संत आणि स्वामी ईश्वर चरण दास यांनी मंदिर परिसरात पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी मोदींनी मंदिर परिसराचा आढावा घेतला. ‘वॉल ऑफ हार्मनी’समोर त्यांनी अनेक अधिकारी आणि संतांची भेट घेतली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community