आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असतो. अशा काळात संत, महंतांच्या सहवासात थोडा वेळ घालवणे, ही एक वेगळी अनुभूती असून पुढील कामांसाठी, सेवेसाठी नवी ऊर्जा आणि शक्ति मिळते, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प.पू. स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) यांच्याबद्दल काढले.
भावसागरातून बाहेर काढतात
बुधवार, 14 फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) यांच्या अमृत महोत्सवानिमित्त एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. “आपल्या धर्मासाठी आयुष्य वेचलेल्या या महान तपस्वीचे जीवन ही आपल्यासाठी रखरखत्या उन्हात सावली देणाऱ्या वटवृक्षासारखे आहे. आज बाजारू स्पर्धा सर्वच क्षेत्रात आहे, त्याला कुठलाही अपवाद नाही. अशावेळी स्वामीजींसारख्या व्यक्तीचाच आधार वाटतो आणि तेच आपल्याला या भावसागरतून बाहेर काढतात. त्यामुळेच आपण खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करू शकतो. ही सेवेची संधी मिळल्यानंतर आपण समाजाला, राज्याला, देशाला अधिकाधिक काही देऊ शकतो, ही भावना स्वामिना भेटल्याननंतर आपोआप उत्पन्न होते, असे शिंदे यावेळी म्हणाले.
तारीखही दिली, मंदिरही बांधलं आणि उद्घाटनही केलं
“शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांच्यासह कोट्यवधी हिंदूचे आयोध्येतील राम मंदिराचे स्वप्न झाले. आम्ही पूर्वी अयोध्येला गेल्यानंतर वेगळेच कंपन जाणवत होते. प्रभू रामचंद्राचे अस्तित्व प्रत्येकालाच जाणवायचे. एका लहानश्या जागेत रामलला बसले होते. आणि आजचे भव्यदिव्य मंदिर ही एक स्वप्न वाटत होते. काही लोक म्हणत होते ‘मंदिर वही बनाएंगे तारीख नही बताएंगे’, ‘पहेले मंदिर फिर सरकार’ असं काहीही बोलत होते,” असे सांगत पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारीखही दिली, मंदिरही बांधलं आणि उद्घाटनही केलं. काश्मीरमधील ३७० कलम हटेल असं कुणाला वाटलं होतं? पण ते अशक्यप्राय काम मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपले कर्मठ गृहमंत्री अमित शहा यांनी केले. तुम्ही भाग्यवान आहात की अबू-धाबीला हिंदूचे मंदिर उभे राहिले. आता जगभरात अशीच मंदिरे उभी राहातील. सुरुवात झाली आहे. मोदी है तो मुंकीं है,” असे शिंदे म्हणाले.
हे येरागबाळ्याचे काम नाही
शिंदे यांनी मोदी यांच्या चांद्रयान मोहिमेचेही कौतूक केले. “चांद्रयान मोहीम यशस्वी करून दाखवले आणि ते ही जिकडे कुणी पोचले नाही. ‘जहा कोई नही पहुंचता वहा मोदीजी पहुंचते है’ और गोविंददेव गिरी महाराजही (Swami Govind Dev Giri Maharaj) पोहोचतात. हे येरागबाळ्याचे काम नाही,” असे शिंदे म्हणाले.
प्राचीन मंदिरे, किल्ल्यांचे जतन
मुख्यमंत्री यांनी प्राचीन मंदिरे यांचे जतन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले यांचे संवर्धन झाले पाहीजे असे सांगून राज्य सरकार ते काम करते, “हीच आपली संस्कृति, परंपरा आहे,” असे शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community