Govind Dev Giri Ji Maharaj : स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचे राष्ट्रयोगी पुस्तक वाचल्यावर स्वामी विवेकानंदच बोलत आहेत अशी अनुभूती येते; आमदार आशिष शेलार यांचे गौरवोद्गार

'स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक' आणि 'हिंदु जनजागृती समिती' यांच्या वतीने स्वामीजींच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने १४ फेब्रुवारी रोजी त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

760
Ashish Shelar : भाजपाचे मुंबई अध्यक्ष साडेतीन हजारांच्या मताधिक्यांतही खुश

मी रामकृष्ण मठातील स्वामी विवेकानंदांची प्रसिद्ध झालेली पुस्तके वाचली. स्वामीजींचे जीवन आणि जगभरामध्ये हिंदुत्व आणि आपला विचार पसरवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्यासोबत जगण्याचे सगळ्यात सोपे तत्वज्ञान, जीवनाचा खरा अर्थ या सगळ्याचे तत्वज्ञान सांगणारे स्वामी विवेकानंद यांची पुस्तके आपण वाचली. त्यानंतर स्वामी गोविंदगिरीजी महाराज (Govind Dev Giri Ji Maharaj) यांनी लिहिलेले राष्ट्रयोगी पुस्तक आपण वाचले, तेव्हा स्वामी विवेकानंद आज तुमच्याच माध्यमातून बोलत आहेत की काय, अशी अनुभूती येते, असे लिखाण आपल्याकडून झाले आहे, असे गौरवोद्गार भाजपचे मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी काढले.

बुधवार, १४ जानेवारीला दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात संपन्न झालेल्या स्वामीजींच्या अमृत महोत्सवाच्या सन्मान सोहळ्यात रणजीत सावरकर बोलत होते. हा कार्यक्रम ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने स्वामीजींच्या ( Govind Dev Giri Ji Maharaj) भव्य आणि दिव्य कार्याप्रती कृतज्ञता म्हणून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी व्यासपीठावर विधान परिषदेच्या उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे, सुदर्शन वाहिनेचे संपादक सुरेश चव्हाणके, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार आणि भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर आणि हिंदु जनजागृती समितीचे (Hindu Janajagruti Samiti) राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

(हेही वाचा : Swami Govind Dev Giri Ji Maharaj : राजसत्ता आणि धर्मसत्तेला एकाच मंचावर आणण्याचे अद्भुत कार्य स्वामीजींनी केले; राहुल शेवाळे यांचे गौरोवोद्गार)

समस्त विश्वातील माणसाला ज्ञानी करण्याचे व्रत स्वतः महाराजांनी घेतले 

आज त्यांचे राष्ट्रयोगी पुस्तक ज्यांना कुणाला वाचण्याची संधी मिळाली असेल तर नक्की सांगतील, पण ज्यांना वाचण्याची संधी मिळाली नसेल तर त्यांनी मुद्दाम वाचावे. कारण सरस्वतीपूजन आज आपण करतो, ज्यांच्या जिभेवर सरस्वती आहे बरोबरीने त्यांच्या लेखणीमध्ये सुद्धा सरस्वती आहे असा परिचय महाराजांचे हे राष्ट्रायोगी पुस्तक वाचल्यावर होतो, असेही आमदार आशिष शेलार म्हणाले. आज वसंतपंचमी आहे, या दिवशी आपण सरस्वतीचे पूजन करत असतो. त्याच दिवशी ज्यांच्या वाणीत सरस्वती आहे, अशा स्वामींना (Govind Dev Giri Ji Maharaj)  भेटण्याचा आपल्याला योग आला आहे. भगवद्गीता असेल, रामायण असेल या सगळ्याबद्दलची प्रवचने केवळ महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर संपूर्ण देशभर प्रवचन आणि निरूपणाने समस्त विश्वातील माणसाला ज्ञानी करण्याचे व्रत स्वतः महाराजांनी घेतले आणि ते व्रत संपूर्ण होईपर्यंत कधी या ज्ञानाच्या झऱ्याला त्यांनी पाठ दाखवली नाही, असेही आमदार शेलार म्हणाले.

(हेही वाचा : Govind Dev Giri Ji Maharaj : जय श्रीराम म्हणत आपण घरी जाऊन झोपणार असू, तर पुन्हा दुष्टचक्र माथी बसायला वेळ लागणार नाही; रणजित सावरकर यांचा इशारा)

आबूधाबीला आखाती देशात हिंदू धर्माचे मोठे मंदिर उभे राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उदघाटन झाले आहे. जगामध्ये असे होऊ शकते, हे जगामध्ये वातावरण निर्माण होण्यासाठी ज्या काही साधू-संत, महाराजांनी रक्ताचे पाणी केले. त्यामध्ये आमचे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Govind Dev Giri Ji Maharaj) आहेत. राम जन्मभूमीचा ५०० वर्षांचा संघर्ष, त्यामध्ये बलिदान देणाऱ्यांना आम्ही विसरणार नाही, पण मंदिर प्रत्यक्ष उभारण्यासाठीचे महान कठीण कार्य स्वामीजींनी यशस्वी पूर्ण केले. स्वतःच्या कर्तृत्वाने आदर्श कसा असावा हे दाखवायचे आणि मोठे कार्य करूनही प्रसिद्धीपासून दूर राहायचे आणि मोक्षाच्या मार्गावर सर्व मानवजातीला नेण्याचे कार्य एक मार्गाने सुरु ठेवायचे असे अलौकिक कार्य स्वामी गोविंददेवगिरी महाराज करत आहेत, असे आमदार आशिष शेलार म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.