Congress देखील फुटीच्या वाटेवर? पक्षाच्या बैठकीला कोण कोणत्या आमदारांनी मारली दांडी…

आमदार अनुपस्थिती बाबत पटोले यांनी काही आमदार आमच्या परवानगीने गैरहजर राहणार असल्याचे सांगितले. तसेच राज्यसभा निवडणूक जरी झाली तरी काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी होईलच, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.

324
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी जाहीर; जाणून घ्या नितिन गडकरी विरुद्ध कोण ?

राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Elections) काँग्रेसकडून (Congress) चंद्रकांत हंडोरे हे आज गुरुवारी (१५ फेब्रुवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. परंतु, त्याआधी काँग्रेसची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. काल बुधवारी सुद्धा काँग्रेसने विधानभवनात आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला १२ आमदार गैरहजर राहिले होते. ज्यामुळे काँग्रेसही फुटीच्या वाटेवर आहे का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. (Congress)

काँग्रेस (Congress) विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या (Congress) आमदारांच्या बैठकीत आज देखील काही आमदार गैरहजर असल्याचे चित्र समोर आले आहे. मात्र या बैठकीला आमदार मोहन हंबर्डे, माधव जवळगावकर, सुलभा खोडके, अमित देशमुख, झिशान सिद्दीकी आणि जितेश अंतापुरकर हे गैरहजर होते. (Congress)

(हेही वाचा – Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाकडून ‘निवडणूक रोखे योजना’ रद्द)

परवानगीनेच आमदार अनुपस्थितीत आहेत – नाना पटोले

आमदार अनुपस्थिती बाबत पटोले यांनी काही आमदार आमच्या परवानगीने गैरहजर राहणार असल्याचे सांगितले. तसेच राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Elections) जरी झाली तरी काँग्रेस (Congress) पक्षाचा उमेदवार विजयी होईलच, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला. या बैठकीनंतर चंद्रकांत हंडोरे यांचा राज्यसभेचा उमेदवार अर्ज भरला जाणार आहे. (Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.