- ऋजुता लुकतुके
फोर्ड कंपनी खरं तर भारताला नवीन नाही. पण, फोर्ड एंडिव्हर गाडीनंतर कंपनीने जवळ जवळ भारतीय बाजारपेठेतून माघार घेतली होती. आता कंपनी भारतीय बाजारपेठेत परतण्याच्या तयारीत आहे. आणि त्यासाठी कायदेशीर पावलं कंपनीने उचलली आहेत ती, म्हणजे नवीन एंडिव्हर गाडीच्या डिझाईनचं त्यांनी पेटंट मिळवलं आणि पाठोपाठ मस्टँग मॅक ई या गाडीची नेमप्लेट कंपनीने ट्रेडमार्क केली आहे. २०२१ मध्ये कंपनीने भारतात आपला गाशा गुंडाळला होता. पण, आता परत येताना त्यांनी दमदार पाऊल टाकलं आहे. (Ford Mustang Mach E)
फोर्ड मस्टँग ई ही गाडी पूर्णपणे आधुनिक, नवीन पिढीला आकर्षित करेल अशी आणि पूर्णपणे भारतात आयात केली जाणारी गाडी असेल. भारतात कदाचित या गाडीचं नाव सीबीयु दिलं जाईल. खरंतर गाडीची किंमत १ कोटींच्या घरात आहे. पण, इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी जीएसटीतील सूट पाहता गाडी ७० लाखांमध्येही उपलब्ध होऊ शकते. (Ford Mustang Mach E)
Ford Mustang Mach-E Trademark Registered In India, Launch Soon? https://t.co/Q0y0vhIBOq
— MotorBeam (@MotorBeam) February 13, 2024
(हेही वाचा – Ferrari Purosangue : फेरारीची पहिली एसयुव्ही गाडी आता भारतात)
मस्टँग मॅक ई ची या गाड्यांशी असणार स्पर्धा
मस्टँगची आरडब्ल्यूडी, एडब्ल्यूडी, तसंच स्टँडर्ड आणि एक्सटेंडेड अशी व्हेरियंट उपलब्ध असतील. आरडब्ल्यूडी या मूलभूत डिझाईनमध्ये ७२ किलोवॅट्सची बॅटरी असेल. त्यामुळे २६९ अश्वशक्तीची ताकद गाडीत निर्माण होऊ शकेल. आणि एकदा चार्ज केल्यानंतर गाडी ४७० किलीमोटर पर्यंत धावू शकेल. तेच एडब्ल्यूडी गाडी ६०० किलोमीटरपर्यंत धावू शकेल. (Ford Mustang Mach E)
फोर्ड कंपनीने मस्टँग नेमकी कधी भारतात लाँच करणार हे सांगितलेलं नाही. पण, अलीकडेच चेन्नईमधील आपलं सगळ्यात मोठं सेल्स केंद्र विकण्याचा निर्णय मागे घेतला होता. तसंच आता भारतात मस्टँग मॉडेल ट्रेडमार्कही केला आहे. त्यामुळे भारतात ही गाडी लाँच होणार आहे. ती झाली की तिची स्पर्धा असेल ती मर्सिडिझ ईक्यूई, बीएमडब्ल्यू आयएक्स आणि ऑडी क्यू८ ईट्रॉन. (Ford Mustang Mach E)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community