Baban Gholap यांचा उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’

पाच वेळा आमदार राहिलेल्या घोलप यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. बबनराव घोलप हे माजी मंत्री आहेत. देवळाली मतदारसंघात ते पाच वेळा आमदार राहिले आहेत.

356
Baban Gholap यांचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'

शिवसेनेचे उपनेते आणि २५ वर्षे आमदार राहिलेले बबन शंकर घोलप (Baban Gholap) यांनी गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी आपल्या ‘शिवसैनिक’ पदाचा राजीनामा देत ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला. स्थानिक राजकारणाच्या नाराजीतून हे सर्व घडल्याची माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा – Ferrari Purosangue : फेरारीची पहिली एसयुव्ही गाडी आता भारतात)

भाजपचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना ठाकरे गटात प्रवेश देण्यात आला. त्यावरून ते नाराज होते. बबनराव घोलप (Baban Gholap) हे शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण आता ही जागा भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळू शकते. त्यामुळे घोलप यांनी राजीनामा दिला आहे.

निष्ठेने काम केले तरी अपमानित करण्यात आले – बबन घोलप

“मी (Baban Gholap) आज माझ्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे. कारण आजपर्यंत शिवसैनिक म्हणून मी निष्ठेने व ईमानेईतबारीत काम केले आहे. मला पक्षाने (संघटनेने) जे जे सांगितले, ते प्रामाणिकपणे केले आहे. पण अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदावरून काढून मला अपमानित करण्यात आले. तसेच मी ज्या निष्क्रीय पदाधिकाऱ्यांना काढून टाकले होते व नविन पदाधिकारी नेमले होते. त्यांनाही बदलण्यात आले, हे कितपत बरे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकनिष्ठ शिवसैनिक अमर कतारीला कुठच ठेवलं नाही. विशेष म्हणजे ज्या सहा विधानसभा संपर्क प्रमुखांनी लेखी कळवले होते की, हे जुने पदाधिकारी कसे बिनकामाचे विकाऊ आहेत. ते लक्षात येऊन सुध्दा त्यांना परत घेऊन पदे दिली, हे सर्व पाहून मी अचंबित आहे. नेमकं माझं काय चुकलं ते समजलं नाही. मी याबाबत दादही मागितली पण काहीच उत्तरं मिळालं नाही. माझे वकिली करणारेही गप्प आहेत. त्यापेक्षा आपण थांबून घेणे महत्वाचे वाटते, म्हणून मी माझ्या शिवसैनिक पदाचा राजीनामा देत आहे.”

(हेही वाचा – Congress देखील फुटीच्या वाटेवर? पक्षाच्या बैठकीला कोण कोणत्या आमदारांनी मारली दांडी…)

राजकीय कारकीर्द

पाच वेळा आमदार राहिलेल्या घोलप (Baban Gholap) यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. बबनराव घोलप हे माजी मंत्री आहेत. देवळाली मतदारसंघात ते पाच वेळा आमदार राहिले आहेत. पहिल्या विधानसभेतच थेट मंत्री म्हणून गळ्यात माळ पडली. मंत्री म्हणून महाराष्ट्रभर दौरा करून आपला समाज एकत्र करणारा करण्याची हातोटी त्यांच्यात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.