भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) (Isro) शनिवार १७ फेब्रुवारी रोजी इन्सेट-3डीएस या अत्याधुनिक हवामान उपग्रहाचे पक्षेपण करणार आहे. हवामानाची अचूक माहिती व अपडेटस मिळावे म्हणून शनिवारी संध्याकाळी ५:३० वाजता जीएसएलव्ही एफ-14 या रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपण केले जाणार आहे. इस्त्रोने नुकत्याच चंद्रयान-३, आदित्य एल-१ या सारख्या मोठ्या मोहीमा राबवल्या आहेत.
(हेही वाचा – Congress देखील फुटीच्या वाटेवर? पक्षाच्या बैठकीला कोण कोणत्या आमदारांनी मारली दांडी…)
इनसेट- 3डीएस उपग्रहाचे प्रक्षेपण –
इनसेंट-3 मालिकेतील उपग्रहांमध्ये ६ वेगवेगळ्या प्रकारचे जियोस्टेशनरी उपग्रहाचे (Isro) प्रक्षेपण केले जाणार आहे. यातील हा सहावा उपगर असून पुढील महिन्यात सातवा उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे. हवामानाचा अचूक अंदाज देता यावा यासाठी इनसेंट-३ मालिके अंतर्गत विविध उपग्रह हे प्रक्षेपित केले जाणार आहे. त्या अंतर्गत इनसेट- 3डीएस उपग्रहाचे प्रक्षेपण हे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले आहे. हा ग्रह प्रक्षेपण तयारीसाठी बेंगळुरू येथील यूआर राव उपग्रह केंद्रातून पुढे पाठवण्यात आला आहे.
(हेही वाचा – Ford Mustang Mach E : मस्टँग मॅक ई सह फोर्ड कंपनीची भारतात परतण्याची तयारी)
जमीन, समुद्र, हवामान आणि इमर्जन्सी सिग्नल यंत्रणेची माहिती देणे होणार सोपे –
या उपग्रहाद्वारे जमीन, समुद्र, हवामान आणि इमर्जन्सी (Isro) सिग्नल यंत्रणेची माहिती देणे सोपे होणार आहे. सध्याच्या इन्सेंट मालिकेतील उपग्रहांची शक्ति आणि क्षमता वाढण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या उपग्रहांच्या साह्याने बचाव आणि मदत कार्य देखील राबवणे सोपे होणार आहे. या उपग्रहांमध्ये ३-ए, ३डी आणि ३डी प्राइम ही आधुनिक यंत्रणा लावण्यात आली आहे. या द्वारे भारतातील हवामान बदलांची अचूक आणि वेळेवर माहिती देता येणार आहे. या उपग्रहाचे वजन हे २२७५ किलो आहे. या उपग्रहांच्या (Isro) निर्मितीमध्ये भारतीय उद्योगांचे मोलाचे योगदान आहे. लिफ्ट ऑफ द्रव्यमान हे रॉकेटचे प्रारंभिक द्रव्यमान आहे. या उपग्रहाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हे प्रक्षेपण सामान्य नागरिकांना पाहता यावे यासाठी इस्रोने लॉन्च व्ह्यू गॅलरी (एलव्हीजी), एसडीएससी-एसएचएआर श्रीहरिकोटा येथून थेट पाहण्याची सोय केली आहे. यासाठी इस्रोच्या संकेत स्थळावर माहिती देण्यात आली आहे. (Isro)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community