Ind vs Eng 3rd Test : ध्रुव जुरेलचा पदार्पणापूर्वी भावूक संदेश

भारतीय संघात पदार्पण करण्यापूर्वी ध्रुव जुरेलने आतापर्यंतच्या प्रवासासाठी वडिलांचे आभार मानले आहेत. 

208
Ind vs Eng 3rd Test : ध्रुव जुरेलचा पदार्पणापूर्वी भावूक संदेश
  • ऋजुता लुकतुके

अपेक्षेप्रमाणेच इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात ध्रुव जुरेल (dhruv jurel) आणि सर्फराझ खान यांचा समावेश करण्यात आला. कसोटीच्या एक दिवस आधीच जुरेलला संघातील समावेशाची कुणकूण लागली होती. त्यामुळे तो थोडा भावूक झाला होता. आणि अशावेळी त्याला राजकोटमध्ये सगळ्यात जास्त आठवण येत होती ती त्याच्या वडिलांची. बुधवारी सराव सत्रानंतर बीसीसीआयच्या (BCCI) सोशल मीडियावर जुरेलचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. आणि यात त्याने वडिलांबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. (Ind vs Eng 3rd Test)

‘तुम्ही माझे हीरो आहात,’ अशी सुरुवात करत जुरेल (dhruv jurel) पुढे म्हणतो, ‘मला उद्या भारतीय कॅप मिळाली तर तो क्षण मी वडिलांना समर्पित करेन!’ विराट कोहली उर्वरित तीन कसोटींसाठीही उपलब्ध होणार नाही म्हटल्यावर भारतीय संघात बदल होणं क्रमप्राप्त होतं. आणि अशावेळी यष्टीरक्षणाबरोबरच फलंदाजी करू शकेल अशा ध्रुव जुरेलला निवड समितीने पसंती दिली. आणि कोना भरतला पहिल्या २ कसोटींत खेळवल्यानंतर जुरेलला आता संधी मिळाली आहे. (Ind vs Eng 3rd Test)

(हेही वाचा – BMC : पालकमंत्रीच नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीने पाच आमदारांना महापालिकेचा निधी)

जुरेलची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे इतकी

२३ वर्षीय जुरेलने (dhruv jurel) प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीचा ठसा उमटवलेला आहे. खासकरून आयपीएलमध्ये १७३ धावांच्या स्ट्राईकरेटने त्याने धावा केल्या आहेत. १५ प्रथमश्रेणी सामन्यांत आतापर्यंत त्याने ७९० धावा केल्या आहेत त्या ४४ च्या सरासरीने. १ शतकही त्याच्या नावावर आहे. त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे नाबाद २४६. (Ind vs Eng 3rd Test)

‘माझे वडीलच माझ्यासाठी हीरो आहेत. मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आणि मला कधीही काही अडचण आली तर मी त्यांचाच सल्ला घेतो. म्हणूनच मला भारतीय संघात जागा मिळाली तर तो क्षण मी त्यांच्यासाठी जगेन,’ असं जुरेल (dhruv jurel) बीसीसीआयच्या (BCCI) व्हिडिओत म्हणाला आहे. गुरुवारी सकाळी राजकोट कसोटी सुरू होण्यापूर्वी माजी कसोटीपटू दिनेश कार्तिककडून ध्रुव जुरेलला भारतीय संघाची कॅप प्रदान करण्यात आली. (Ind vs Eng 3rd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.