त्यांचे खरे नाव 'धुंडीराज गोविंद फाळके' असे आहे.

ते एक उत्तम लेखक, तसेच उत्तम दिग्दर्शक होते.

१९ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास ९५ चित्रपट व २६ लघुपटांची निर्मिती केली.

'राजा हरिश्चंद्र' हा त्यांचा पहिला मूक चित्रपट.

हा चित्रपट त्यांनी अवघ्या १५ हजारात बनवला.

त्यांनी देशातील पहिला मूक चित्रपट बनवला म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हटले जाते.

त्यांच्या सन्मानार्थ भारतीय चित्रपटसृष्टीतील 'दादासाहेब फाळके पुरस्कार' हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो.