- ऋजुता लुकतुके
आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघाने बलाढ्य चीनवर ३-२ अशी मात केली. चीनचा नियमित संघ खेळत असताना केलेल्या या कामगिरीचं मोल मोठं आहे. कारण, चीन हा या खेळातील अव्वल संघ आहे. शिवाय या स्पर्धेतून पी व्ही सिंधूने ४ महिन्यांच्या दुखापतीच्या ब्रेकनंतर कोर्टवर यशस्वी पुनरागमन केलं आहे. (Badminton Asian Championship)
भारताचा समावेश डब्ल्यू गटात झाला होता. आणि संघाने बाद फेरी आधीच गाठली होती. पण, शेवटचा साखळी सामना चीनविरुद्ध असल्यामुळे संघाच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष होतं. भारताचा पहिलाच सामना पी व्ही सिंधू खेळली. ऑक्टोबर २०२३ नंतर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळताना सिंधूने आक्रमक बॅडमिंटनचं प्रात्यक्षिक दाखवून दिलं. चीनची अव्वल खेळाडू हॅन यूवर तिने सरळ गेममध्ये २१-१७ आणि २१-१५ अशी मात केली. सिंधूच्या खेळात कसलंही अवघडलेपण नव्हतं. (Badminton Asian Championship)
We enter quarterfinals as table toppers after beating 🇨🇳 3-2, let that sink in 🔥
Proud of you girls, keep it up! 👊#BATC2024#TeamIndia#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/ysFhXwICTw
— BAI Media (@BAI_Media) February 14, 2024
(हेही वाचा – Captain Rohit Sharma : टी-२० विश्वचषकात रोहितच कर्णधार, बीसीसीआय सचिवांची ग्वाही)
सिंधूच्या विजयामुळे भारताने १-० आघाडी मिळवली असली तरी पुढील दोन सामने तनिषा-अश्विनी जोडी आणि अश्मिता चलिहाने गमावल्यामुळे लगेचच भारतीय संघ १-२ असा मागेही पडला. पण, गायत्री आणि त्रिशाने पुढचा दुहेरीचा सामना जिंकून २-२ अशी बरोबरी साधली. आता पाचवा आणि निर्णायक सामना होता तो नवखी अनमोल खरब आणि अनुभवी यु लूई यु यांच्यात. पण, १ तास आणि १७ मिनिटं चाललेला हा सामना अखेर अनमोलने २२-२०, १४-२१ आणि २१-१८ असा जिंकला. (Badminton Asian Championship)
भारतीय महिला संघाने आता आशियाई सांघिक स्पर्धेत उपउपांत्य फेरी गाठली आहे. आणि जागतिक स्तरावर या खेळातही भारत एक ताकद म्हणून उभा राहत आहे. (Badminton Asian Championship)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community