Veterinary Hospital : महालक्ष्मीतील पशुवैद्यकीय रुग्णालय मार्च महिन्यात होणार सुरु

मुंबई महापालिकेच्या महालक्ष्मी येथील आर्थर रोड कारागृहाच्या मागील बाजूस ३०४५चौ मीटरचा भूखंड आहे. या भूखंडावर सर दोराबजी टाटा ट्रस्ट (एसडी टिटी) या संस्थेच्यावतीने बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर या रुग्णालयाची उभारणी करण्यात येत आहे.

966
Veterinary Hospital : महालक्ष्मीतील पशुवैद्यकीय रुग्णालय मार्च महिन्यात होणार सुरु

परळमधील बैलघोडानंतर मुंबईत आणखी एक पशुवैद्यकीय रुग्णालय (Veterinary Hospital) महालक्ष्मी येथील महापालिकेच्या भूखंडावर जात असून या रुग्णालयाचे आता ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या मार्च महिन्यात हे बांधकाम पूर्ण होऊन त्यांचे लोकार्पण केले जाणार आहे. पशुवैद्यकीय रुग्णालयासोबतच याठिकाणी जनावरांच्या शवदाहिनीचीही व्यवस्था आहे. या पशुवैद्यकीय रुग्णालय (Veterinary Hospital) व शवदाहिनीचे काम पूर्ण होऊन जानेवारी २०२३ मध्ये लोकार्पण होणे अपेक्षित होते, पुढे डिसेंबर २०२३ची डेडलाईनही पार झाल्याने आता मार्चपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याने हा प्रकल्प लांबणीवर पडत असल्याचे दिसून येत आहे. (Veterinary Hospital)

मुंबई महापालिकेच्या महालक्ष्मी येथील आर्थर रोड कारागृहाच्या मागील बाजूस ३०४५चौ मीटरचा भूखंड आहे. या भूखंडावर सर दोराबजी टाटा ट्रस्ट (एसडी टिटी) या संस्थेच्यावतीने बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर या रुग्णालयाची (Veterinary Hospital) उभारणी करण्यात येत आहे. या संस्थेला ३० वर्षाच्या कालावधीकरिता हे रुग्णालय चालविण्यास दिले जाणार आहे. याबाबतच्या करार पत्रावर स्वाक्षरी झाल्यानंतर या जागेवर रुग्णालय आणि प्राण्याच्या शवदाहिनीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे या रुग्णालयाचे बांधकाम हे जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तसा विश्वासही व्यक्त केला होता. पुढे हे बांधकाम पूर्ण होण्याची डेडलाईन डिसेंबर २०२३ पर्यंत नेण्यात आली आणि आता हे बांधकाम २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंत हे बांधकाम ९० टक्के पूर्ण झाले असल्याचे पशुवैद्यकीय आरोग्य खात्याने स्पष्ट केले. (Veterinary Hospital)

(हेही वाचा – Badminton Asian Championship : भारतीय बॅडमिंटन संघाचा बलाढ्य चीनला ३-२ असा दे धक्का)

या रुग्णालयात एकाच वेळी ३०० छोट्या प्राण्यांना अर्थात कुत्रे, मांजर इत्यादींना दाखल करण्याची सुविधा असणार आहे. महालक्ष्मी धोबीघाट येथील महापालिकेच्या एक एकर जागेत पाळीव प्राण्यांचे आणि भटक्या प्राण्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी पशुवैद्यकीय उपचार, शस्त्रक्रियेसाठी सुसज्ज चार मजली रुग्णालय हे सर दोराबजी टाटा ट्रस्ट व मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ‘बांधा, वापरा’ या धर्तीवर बांधण्यात येत आहे. प्राणी दहनभट्टीची सुविधा ही लहान प्राणी जसे पाळीव श्वान, भटके मृत श्वान, मांजरी, पक्षी यांच्याकरिता मोफत उपलब्ध असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. (Veterinary Hospital)

काय असणार हॉस्पिटलमध्ये
  • ३०० लहान जनावरांसाठी ओपीडी
  • शल्य चिकित्सा कक्ष अर्थात सर्जिकल वॉर्ड
  • अपघात आणि आपत्कालीन कक्ष
  • आयसीयु आणि आयसीयू सुविधा
  • त्वचा आजार कक्ष
  • ओपीडी मेडिसिन
  • एम आर आय
  • डायलिसिस सेंटर
  • सोनोग्राफी
  • रक्तपेढी (Veterinary Hospital)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.