पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे (PM Modi Qatar Visit) अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांची भेट घेतली. तेथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी या दोन्ही नेत्यांनी अनेक द्विपक्षीय आणि जागतिक मुद्यांवर चर्चा केली. भारतीय माजी नौदलाच्या जवानांच्या सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल थानी यांचे आभार मानले. तसेच त्यांना भारतात येण्याचे निमंत्रणही पंतप्रधान मोदींनी दिले.
(हेही वाचा – NCP MLA Disqualification : अजित पवारांकडे बहुमत झुकवणारे ‘ते’ ४१ आमदार कोण ?)
दोन्ही नेत्यांनी (PM Modi Qatar Visit) अंतराळ आणि तंत्रज्ञानातील सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. त्यानंतर अल थानीने पंतप्रधान मोदींसाठी भोजनाचे आयोजन केले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारत आणि कतारमधील व्यापार २० अब्ज डॉलर्स म्हणजेच १.६६ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.
पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीयांची भेट –
तत्पूर्वी, संयुक्त अरब अमिरातीच्या (PM Modi Qatar Visit) दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी बुधवारी (१४ फेब्रुवारी) रात्री कतारची राजधानी दोहा येथे पोहोचले. कतारचे परराष्ट्रमंत्री सोलतान बिन साद अल मुरैखी यांनी विमानतळावर मोदींचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी भारतीय समुदायाच्या सदस्यांचीही भेट घेतली. यावेळी जमावाने ‘मोदी, मोदी “आणि’ भारत माता की जय” अशी घोषणाबाजी केली.
(हेही वाचा – Khar Subway आणि वांद्रे रेल्वे टर्मिनसला जोडणाऱ्या पुलांचे लवकरच बांधकाम)
कतारच्या पंतप्रधानांशी चर्चा
विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर मोदींनी (PM Modi Qatar Visit) कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांची भेट घेतली. भारत-कतार व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि वित्त क्षेत्रांच्या विस्तारावर चर्चा झाली.
(हेही वाचा – Yerawada Jail : आंदेकर टोळीचा राडा; १२ कैद्यांची तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण)
मोदी दुसऱ्यांदा कतार दौऱ्यावर
पंतप्रधान मोदींचा (PM Modi Qatar Visit) हा दुसरा दौरा आहे. यापूर्वी त्यांनी २०१६ मध्ये दोहाला भेट दिली होती. दोन्ही देशांमधील व्यापार सध्या सुमारे २० अब्ज डॉलर्स इतका आहे. कतारमध्ये सुमारे ८ लाख भारतीय राहतात आणि ते त्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community