BMC : मुंबईकरांना आणखी तीन तरण तलावात लुटता येणार पोहण्याचा आनंद; येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये होणार लोकार्पण

वरळी, विक्रोळी आणि अंधेरी पूर्व येथील या जलतरण तलावांचे बांधकाम पूर्ण झाल्याने पुढील सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये ते सुरु होणे अपेक्षित असल्याचे उपायुक्त किशोर गांधी यांनी स्पष्ट केले. ही तिन्ही तरण तलाव लवकरात लवकर सुरु करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

2722
Goregaon Film City Road : गोरेगावमधील फिल्मसिटी मार्गावर पुन्हा वाढले फेरीवाले, मे महिन्यात घडला होता तो प्रकार
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC) आणखी तीन नवीन जलतरण तलावांचे (Swimming Pools) बांधकाम हाती घेण्यात आले असून हे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हे तिन्ही जलतरण तलाव येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये खुले केले जाण्याची शक्यता आहे. वरळी टेकडी जलाशयाच्या ठिकाणी, विक्रोळीतील टागोर नगर आणि अंधेरी पूर्व येथील कोंडिविटा आदी परिसरांमध्ये हे जलतरण तलाव सुरु केले जाणार आहेत. (BMC)

मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC) मागील वर्षी मार्च महिन्यांमध्ये अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल येथील जलतरण तलावाचे लोकार्पण उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढांच्या (Mangal Prabhat Lodha) हस्ते करण्यात आल्यानंतर आता आणखी तीन जलतरण तलावांचे (Swimming Pools) लोकार्पण येत्या काही दिवसांमध्ये केले जाणार आहे. मागील काही वर्षांपासून विक्रोळी टागोर नगर, अंधेरी पूर्व येथील कोंडिविटा आणि वरळी टेकडी जलाशय परिसरातील जलतरण तलावांचे बांधकाम सुरु होते. या तिन्ही तरण तलावांचे (Swimming Pools) बांधकाम पूर्णत्वास आलेले असून या तिन्ही ठिकाणी २७५० एवढी सदस्य संख्या असेल. या तरण तलावांचा आकार हा २५ बाय १५ चौरस मीटरचा असून प्रारंभी मनुष्यबळाअभावी रखडलेल्या लोकार्पणामध्ये ही समस्या दूर होत असल्याने लवकरच तिन्ही तरण तलावांचे लोकार्पण करण्यात येईल अशी माहिती मिळत आहे. (BMC)

(हेही वाचा – IPL 2024 : आयपीएलचा हंगाम भारतात होणार)

वरळी, विक्रोळी आणि अंधेरी पूर्व येथील या जलतरण तलावांचे (Swimming Pools) बांधकाम पूर्ण झाल्याने पुढील सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये ते सुरु होणे अपेक्षित असल्याचे उपायुक्त किशोर गांधी यांनी स्पष्ट केले. ही तिन्ही तरण तलाव लवकरात लवकर सुरु करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या तरण तलावाच्या ठिकाणीही सदस्य नोंदणी ही ऑनलाईन असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.