तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्या लोकसभेत जादवपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, मिमीने अद्याप लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे आपला राजीनामा सादर केलेला नाही. त्यांनी आपला राजीनामा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठवला आहे. मिमी स्थानिक पातळीवरील पक्षाच्या नेतृत्वावर खूष नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
(हेही वाचा – Elephanta Caves : घारापुरी येथे हिंदुत्वनिष्ठांनी केली शिवलिंगाची पूजा)
काय म्हणाल्या मिमी चक्रवर्ती ?
“राजकारण माझ्यासाठी (Mimi Chakraborty) नाही, इथे जर तुम्ही कोणाला मदत करत असेल तर तुम्हाला त्यांचा प्रचार करावा लागतो. राजकारणाबरोबरच मी एक अभिनेत्री म्हणूनही काम करते, माझी जबाबदारी दोन्ही बाजूंनी सारखीच आहे. जर कोणी राजकारणात आले, मग तुम्ही काम करत असाल किंवा नसाल, तुम्हाला चांगले किंवा वाईट म्हटले जाते.
दीदी जे सांगतील त्यानुसार पुढचा निर्णय –
याबाबत मी (Mimi Chakraborty) ममता बॅनर्जी यांच्याशी बोलले आहे. ज्या पक्षाने मला पुढे येण्याची संधी दिली, मी त्यांना आधी माझ्या राजीनाम्याची माहिती देऊ इच्छिते. २०२२ मध्येही मी एकदा दीदींशी माझ्या खासदारपदाच्या राजीनाम्याविषयी बोलले होते. मात्र तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आताही दीदी जे सांगतील त्यानुसार मी (Mimi Chakraborty) पुढचा निर्णय घेईन.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community