बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाची (Prabodhankar Thackeray Theater) अंतर्गत भागातच दुरवस्था झालेली असून नाट्यगृहातील खुर्च्या तसेच छताला गळती लागल्याने छत आणि भिंतीचाही भागही खराब झालेला आहे. मराठी नाटकांसह हिंदी आणि गुजराती नाटकांचे प्रमुख ठिकाण असलेल्या प्रबोधनकारांचे नाव दिलेल्या या नाट्यगृहाच्या डागडुजीकडे महापालिका प्रशासनाचे (Municipal Administration) पुरते दुर्लक्ष झाले आहे. या नाट्यगृहाची अंतर्गत दुरवस्था पाहून नाट्यरसिकांमध्ये तीव्र नाराजी आणि भीती व्यक्त केली जात आहे. सुमारे ५९ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकडे या नाट्यगृहाच्या डागडुजीसाठी पैसे नाहीत की प्रशासनाला यासाठी खर्च करायचे नाहीत असा सवाल नाट्यरसिकांकडून केला जात आहे. (Prabodhankar Thackeray Theater)
बोरीवली पश्चिम येथील सोडावाला लेनमध्ये असलेले प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे नाट्यमंदिर संकुल हे महापालिकेच्या मालकीचे आहे. याठिकाणी १०२६ आसनांचे मुख्य नाट्यगृह असून २०६ आसनी हे लघु नाट्यगृह आहे. याशिवाय तालीम कक्ष, निवासी खोल्या, कलादालन, परिषद सभागृह, समाजमंदिर सभागृह व इतर सभागृहे आदींचे व्यवस्थापन महापालिकेच्या माध्यमातून राखले जाते. (Prabodhankar Thackeray Theater)
(हेही वाचा – Haldwani violence : मुख्य आरोपी अब्दुल मलिकविरोधात लुकआऊट नोटीस जारी; आतापर्यंत ४२ जणांना अटक)
नाट्यरसिकांना सहन करावा लागतो त्रास
मात्र, मागील काही महिन्यांपासून नाट्यगृहातील काही खुर्च्या तुटलेल्या व फाटलेल्या अवस्थेत असूनही महापालिका प्रशासनाचे (Municipal Administration) त्याकडे लक्ष नाही. तसेच अंतर्गत भागात गळती लागल्याने अनेक भिंती खराब झालेल्या आहेत शिवाय छताचे फॉल सिलिंगही तुटले गेले आहे. परंतु सात ते आठ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही याच्या दुरुस्तीचे काम महापलिकेच्यावतीने हाती घेतले जात नाही. याठिकाणी आलेल्या नाट्यरसिकांना बऱ्याचदा तुटलेल्या आणि फाटलेल्या खुर्च्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. तर खराब झालेल्या भिंती व तुटलेल्या लाद्या तसेच फॉल सिंलिंगमुळे नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. (Prabodhankar Thackeray Theater)
नाट्यरसिकांच्या म्हणण्यानुसार बोरीवलीतील हे एकमेव नाट्यगृह आहे. याठिकाणी मराठी नाटके पाहण्याचा आनंद लुटता येतोच, पण याठिकाणी असलेल्या गुजरातील नाटकांमुळेही येथे मराठी नाटकांना जास्त तारखा मिळत नाही. परंतु हे एकमेव नाट्यगृह (Prabodhankar Thackeray Theater) असताना महापालिकेकडून त्यांची योग्य प्रकारे देखभाल ठेवली जात नाही. तुटलेल्या खुर्च्यांमुळे अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना बसताना त्रास होऊ शकतो. त्यामुळे बऱ्याचदा ही समस्या तेथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली, पण ते सांगतात की याच्या ऑडीटोरियमचे काम केले जाणार आहे. पण गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून मी हेच ऐकत आहे. मुख्य नाट्यगृहाप्रमाणेच लघुनाट्यगृहालाही जास्त प्रतिसाद असतो. काही महिन्यांपूर्वी हे नाट्यगृह (Prabodhankar Thackeray Theater) बंद ठेवण्यात आले होते आणि त्यानंतर या कामाची पाहणी करून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला होता, पण पुढे काहीच झालेले नाही. परिणामी आज या दोन्ही नाट्यगृहाच्या इमारतींची तसेच ऑडीटोरियममधील खुर्च्या तुटून फाटून दुरवस्था झाल्याचे पहायला मिळते. (Prabodhankar Thackeray Theater)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community