ऋजुता लुकतुके
भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने (Harmanpreet Singh) दोन गोल केले. भारतीय (India) आघाडीही आक्रमक होती. पण, अखेर भुबनेश्वरमध्ये सुरू असलेल्या प्रो लीग हॉकीच्या साखळी सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून ४-६ असा पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या एका क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने केलेले ३ गोल भारताला महागात पडले. (FIH Hockey Pro League)
ऑस्ट्रेलियन (Australia) संघाने सामन्यात सुरुवात मात्र दिमाखात केली. आणि गोलचं खातंही दुसऱ्याच मिनिटाला उघडलं. पहिला गोल करणाऱ्या ब्लेक गोव्हर्सने लगेचच दुसरा गोल करून संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पण, त्यानंतर भारतीय खेळाडू या सुरुवातीच्या धक्यातून सावरले. हरमनप्रीतने १२ व्या आणि २०व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला २-२ अशी बरोबरी साधून दिली.
(हेही वाचा – BMW 5 Series 2024 : बीएमडब्ल्यू ५ सीरिजची जागतिक सफर सुरू, भारतातही येण्याची शक्यता)
भारताचा खेळ चपळ आणि चढाया करणारा
त्यानंतरही भारताचा खेळ चपळ आणि चढाया करणाराच होता. कारण, सुखजीत सिंग (Surjeet Singh) आणि मनजीत सिंग यांनी ३० व्या मिनिटापर्यंत आणखी २ गोल करत भारताला ४-२ अशी आघाडीही मिळवून दिली. तिसरा क्वार्टर संपताना झेलेवस्कीने ऑस्ट्रेलियाला आणखी एक गोल करून दिला. आणि चौथा क्वार्टर सुरू होताना गोल संख्या ४-३ अशी भारताच्या बाजूने होती.
A Goal Fest we witnessed tonight.
A game of comebacks.
The first half belonged to Team India, second half Australians dominated and completed the win with a 6-4 scoreline.
India 🇮🇳 4 – Australia 🇦🇺 6
Goal Scorers:
12′ (PC) 20′ (PC) Singh Harmanpreet
18′ Singh Sukhjeet
29’… pic.twitter.com/9rLVp6VOh3— Hockey India (@TheHockeyIndia) February 15, 2024
भारतीय बचाव फळी गोंधळात पडल्याचा ऑस्ट्रेलियाला फायदा
इथपर्यंत भारतीय संघाचंच सामन्यात वर्चस्व होतं. आणि नियंत्रणही दिसून येत होतं. पण, नेमकी शेवटच्या १० मिनिटांत खेळाची सूत्र फिरली. लाहलन शार्पने ५२ व्या मिनिटाला आधी ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर भारतीय बचाव फळी काहीशी गोंधळात पडली. त्यांच्यातील समन्वयाचा अभावाचा ऑस्ट्रेलियाने बरोबर फायदा उचलला. आणि चेंडू सतत भारतीय गोलजाळ्या जवळच ठेवला.
जेकन अँडरसनने ५५ आणि जॅक वेल्शने ५८ व्या मिनिटाला गोल करत ऑस्ट्रेलियाला चक्क २ गोलची आघाडी मिळवून दिली. यानंतर भारतीय संघाकडे फारसा वेळच नव्हता. आणि ऑस्ट्रेलियाच्या धडाक्यासमोर त्यांचं काही चाललंही नाही. भारतीय संघाचा पुढील मुकाबला शुक्रवारी आयर्लंडशी होणार आहे. (FIH Hockey Pro League)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community