मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची तब्येत सातव्या दिवशी खालावली. गुरुवार, १६ फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे उपचार न घेण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) दार ठोठावले होते. १६ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने जरांगे यांना उपचार घेण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर जरांगेंनी उपचार घेण्यास होकार दिला.
(हेही वाचा – FIH Hockey Pro League : हॉकी प्रो लीगमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ४-६ ने पराभव)
न्यायालयाच्या आदेशानुसार जालना जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील यांच्या देखरेखीखाली जरांगे यांना सलाईन लावण्यात आले आहे. मनोज जरांगेंनी 10 फेब्रुवारीपासून उपोषण आंदोलन सुरु केले आहे.
मुख्यमंत्री नाराज
दरम्यान १६ फेब्रुवारी रोजी राज्य मागासवर्ग आयोगाने (State Backward Classes Commissions) त्यांचा सर्वेक्षण अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवला आहे. ‘सरकार आरक्षण देण्यास अनुकूल असतांना जरांगे यांनी उपोषण करणे उचित नाही’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे’, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
सकल मराठा समाज आक्रमक
मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. नांदेड-हिंगोली, परभणीसह विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू आहे, तसेच जेल भरो आंदोलनही करण्यात येणार आहेत. (Manoj Jarange)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community