- ऋजुता लुकतुके
ह्युंदे कार उत्पादक कंपनी (Hyundai Company) भारतात प्रसिद्ध आहे ती चांगल्या अत्याधुनिक सुविधा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी. भारतात ७ सीटर इस्टेट गाड्यांची गरज मोठी आहे. हे पाहून ह्युंदे कंपनीने (Hyundai Company) आता अशी गाडी भारतात आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. ७ सीटर ही गाडी स्टारगेझर म्हणून ओळखली जाईल. आतापर्यंत मारुतीच्या इर्टिगा गाडीने या प्रकारात आपली सद्दी राखली आहे. त्यानंतर कियाच्या कॅरन गाडीने इर्टिगाला थोडंफार आव्हान दिलं. आता ह्युंदे पूर्ण तयारीनिशी या बाजारपेठेत उतरत आहे. (Hyundai Stargazer)
भारतात कॅरन गाडीची विक्री चांगली सुरू असल्यामुळे स्टारगेझरलाही चांगली बाजारपेठ मिळेल अशी कंपनीची अपेक्षा आहे. ह्युंदे कंपनीने (Hyundai Company) स्टारगेझरविषयी फारशी माहिती अजून दिलेली नाही. पण, त्यांची अल्काझार गाडी २० लाख रुपये किमतीची असल्यामुळे स्टारगेझर ही १० ते २० लाख रुपयांच्या दरम्यान असेल अशीच चिन्हं आहेत. ही गाडी मल्टिपर्पज युटिलिटी व्हेहिकल या श्रेणीत मोडते. आणि तिचा लुकही अत्याधुनिक राहील याची कंपनीने काळजी घेतली आहे. (Hyundai Stargazer)
2023 Hyundai Stargazer MPV Gets ADAS – Bose Audio, New Features (Ertiga Rival) https://t.co/VhmuCFKq0R pic.twitter.com/sgqdvkSD66
— RushLane (@rushlane) August 15, 2023
(हेही वाचा – FIH Hockey Pro League : हॉकी प्रो लीगमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ४-६ ने पराभव)
गाडीची स्पर्धा असणार ‘या’ गाड्यांशी
गाडीचं इंजिन १.५ लीटर पेट्रोल टर्बो इंजिन आहे. भारतात डिझेल इंजिनाची भर पडू शकते. गाडीचं इंटिरिअर मात्र त्या मानाने साधारण असेल. गाडीला सनरुफ, छतावर एसीचे व्हेंट तर इन्फोटेनमेंट सिस्टिमही बेसिक असेल. पण, गाडीत कनेक्टेड तंत्रज्ञान तसंच वायरलेस चार्जिंगची सुविधा असेल. (Hyundai Stargazer)
बाहेरून गाडीचा आकार अंड्यासारखा आहे. तर बॉनेटवर ग्रिल देण्यात आलं आहे. गाडीचे हेडलँप आणि टेल लँपही एलईडी आहेत. वर म्हटल्याप्रमाणे भारतात या गाडीची स्पर्धा मारुती इर्टिगा, टोयोटो इनोव्हा आणि किया कॅरेन या गाड्यांशी असणार आहे. पण, भारतात ही कार नेमकी कधी आणणार यावर अजून ह्युंदे कंपनीने कुठलीही माहिती दिलेली नाही. (Hyundai Stargazer)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community