मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्यावर नारायण राणे यांनी ते आता काहीही बरळत असल्याची टीका केली होती. या टीकेला मनोज जरांगे-पाटलांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, ‘मीही एक नमुना आहे. यापुढे मी सोडणार नसल्याचेही जरांगे यांनी सांगितलं आहे.’
मनोज जरांगे (Manoj Jarange-Patil) बोलल्यानंतर नितेश राणे यांनी संयमी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे, तर नितेश राणे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील हे मोदींच्या राज्यातील सभा उधळणार असल्याचं बोलल्यानंतरच नारायण राणे यांनी त्यांच्या वडीलकीच्या नात्याने सल्ला दिला. आम्ही त्यांना कायम पाठिंबा दिला आहे तसेच जरांगे पाटलांनी तुम्ही राजकीय टीका करू नका. हेच आम्ही सांगत असल्याचंही यावेळ नितेश राणे यावेळी म्हणाले.
(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा)
नितेश राणे म्हणाले की, मराठा समाजासाठी आम्ही काय केलं, ते आम्हाला काहीही सांगायची गरज नाही. मराठा समाजाला स्वत:चं हक्काचं टिकणारं आरक्षण मिळावं, हीच आमची भूमिका राहिली आहे. यामध्ये आम्ही सहभाग घेतला असून त्यासाठी लढलोही आहे.
वडीलकीच्या नात्याने उत्तर
तुम्ही राजकीय टीका करू नका. हेच आम्ही जरांगे यांना सांगितलं आहे. जेव्हा जरांगे मोदींची सभा उधळणार असल्याचे बोलले तेव्हाच नारायण राणे यांनी वडीलकीच्या नात्याने त्यांना उत्तर दिल्याचं नितेश राणे म्हणाले. आपण जबाबदारीने आरक्षणाचा प्रवास अंतिम टप्प्यात घेऊन गेलेलो आहे. काही दिवसांत हक्काचं आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे आपण समाज बांधवांनी समाजात एकजूट ठेवण्याचं काम करावं. जेव्हाही मराठा समाजावर कुठलंही संकट येईल तेव्हा आम्ही समाजाच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले.
मनोज जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरून हलून दाखव. तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत, असे ते म्हणाले.
मनोज जरांगेंनी दिलं प्रत्युत्तर…
मी नारायण राणे यांच्याबद्दल अद्याप तोंडातून ब्र काढला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीं साहेबांनाही ओबीसी असल्याचा अभिमान आहे. मग आम्ही तर मराठ्यांसाठीही आरक्षण मागतोय. तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे. तुम्हाला आमच्या बाजूने बोलताना स्वाभिमान वाटला पाहिजे. मला एकदा त्यांना सुट्टी द्यायची आहे. माझी निलेश राणेंना विनंती आहे की, त्यांनी नारायण राणेंना थांबवावं, कारण मलाही काही मर्यादा आहेत. मी कचाट्यात आलो की, धुवून काढणारा माणूस आहे, असे मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीत आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे यांचा समाचार घेताना म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community