मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या महाअधिवेशनाचा शुभारंभ शुक्रवारी कोल्हापुरातील महासैनिक दरबार मैदानात करण्यात आला. अधिवेशनाला सुरुवात होताच राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांचं मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं. त्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘शिवसेना’ आणि ‘हिंदुत्व’ या विषयावर आपली भूमिका मांडली. याच अधिवेशनात शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी महायुतीचे ४८ उमेदवार निवडून आणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी (Prime Minister Narendra Modi) निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सर्व उपस्थित शिवसैनिकांना शपथ दिली. यावेळी शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, तसेच राज्यातील हजारो पदाधिकारीही उपस्थित होते.
शिवसेनेच्या अधिवेशनात मंत्री शंभूराज देसाई यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व ४८ जागांवर महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावे, यासाठी लागणारे सर्वाधिकार पक्षाचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना देण्याचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला.
(हेही वाचा – Manoj Jarange-Patil: तुम्हाला आमच्या बाजूने बोलताना स्वाभिमान वाटला पाहिजे, नारायण राणेंच्या टीकेला जरागेंनी दिलं प्रत्युत्तर)
तसेच शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी महायुतीचे ४८ उमेदवार निवडून आणत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आणण्यासाठी सर्व उपस्थित शिवसैनिक बंधू भगिनींना शपथ दिली.
शिवसेनेच्या अधिवेशात झालेले ठराव
१. पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या १० वर्षांच्या कारकीर्दीबाबत अभिनंदन
२. देशाचे सहकार मंत्री अमित शाह यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या बहुमोल कामगिरीबाबत अभिनंदन
३. राम मंदिर प्रतिष्ठापनेबद्दल अभिनंदन
४. लोकसभा निवडणुकीत मिशन ४८ म्हणजेच सर्व ४८ जागांवर महायुती विजयी होणे. या दृष्टीने सर्व निर्णय आणि त्याबाबतचे सर्व अधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना देण्यात येत आहेत
५. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्षासाठी अहोरात्र कार्य केले अशा शिवसेना नेत्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वार्षिक सात पुरस्कार देण्याचा निर्णय
हेही पहा –
Join Our WhatsApp Community