- ऋजुता लुकतुके
इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आपला ५००वा कसोटी बळी अखेर मिळवला. आधीच्या विशाखापट्टणम कसोटीत अश्विन दुसऱ्या डावात जीव तोडून गोलंदाजी करत होता. पण, त्याला ३ बळी मिळाले. आणि त्याच्या एकूण बळींची संख्या ४९९ वर राहिली. त्यामुळे इंग्लंडची फलंदाजी सुरू झाल्यावर अश्विनचा ५०० वा बळी नेमका कोण असेल यावर चर्चा रंगली होती. या कसोटीचं समालोचन करणाऱ्या माजी खेळाडूंमध्येही यावर चर्चा झाली. आणि गंमत म्हणजे सुनील गावसकर यांचं भाकीत खरं ठरलं. (Ind vs Eng 3rd Test)
आणि झॅक क्रॉली, बेन डकेट यांची शतकी सलामीच्या दिशेनं वाटचाल सुरू असतानाच भारताला योग्य वेळी हा बळी मिळाला. ‘झॅक क्रॉली अश्विनच्या गोलंदाजीवर त्याच्याकडेच झेल देऊन बाद होईल,’ असं गावसकर म्हणाले होते. झेल काही अश्विनने (Ravichandran Ashwin) पकडला नाही. क्रॉलीचा स्वीपचा फटका फसला. आणि बॅटची वरची कडा घेऊन चेंडू हवेत उंच उडाला, जो रजत पाटिदारने झेलला. (Ind vs Eng 3rd Test)
𝙏𝙝𝙖𝙩 𝙇𝙖𝙣𝙙𝙢𝙖𝙧𝙠 𝙈𝙤𝙢𝙚𝙣𝙩! 👏 👏
Take A Bow, R Ashwin 🙌 🙌
Follow the match ▶️ https://t.co/FM0hVG5pje#TeamIndia | #INDvENG | @ashwinravi99 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/XOAfL0lYmA
— BCCI (@BCCI) February 16, 2024
(हेही वाचा – Maratha Reservation : मागासवर्ग आयोगाचा सर्वेक्षण अहवाल सादर; मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची शिफारस)
अनिल कुंबळे या स्थानावर
कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळी घेणारा अश्विन फक्त दुसरा भारतीय गोलंदाज आहे. तर जागतिक स्तरावर अशी कामगिरी करणारे फक्त ९ गोलंदाज आहेत. मुथय्या मुरलीधरन ८०० बळींसह सगळ्यात वर आहे. तर शेन वॉर्नच्या खात्यात ७०८ बळी आहेत. अनिल कुंबळे ६१९ बळींसह चौथ्या स्थानावर आहे. पहिल्या ९ गोलंदाजांमध्ये मुरलीधरन, वॉर्न, कुंबळे आणि अश्विन असे चार फिरकीपटू आहेत. (Ind vs Eng 3rd Test)
अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉननेही ५१९ बळी पूर्ण केले आहेत. पण, अश्विनने ५०० बळींसाठी फक्त ९८ कसोटी सामने खेळले आहेत. या ५०० बळींमध्ये अश्विनने डावात ५ बळी टिपण्याची कामगिरी ३४ वेळा तर सामन्यात १० बळी टिपण्याची कामगिरी १० वेळा केली आहे. (Ind vs Eng 3rd Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community