Journalist अश्विन अघोर यांचे अकाली निधन

काही दिवसांपूर्वी त्यांना पोटातील संसर्ग झाल्याने ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या शनिवारी सकाळी ८.३० ते १० वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंतिम ठाणे येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

2797
Journalist अश्विन अघोर यांचे अकाली निधन

पत्रकार अश्विन अघोर (५०) यांचे आज शुक्रवारी १६ फेब्रुवारीला दुपारी ३.५० वाजता ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात (Jupitar hospital) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी राधिका आणि मुलगा सौमित्र असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाबद्दल पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. (Journalist)

मुळचे अमरावतीचे अश्विन अघोर यांनी आपल्या पत्रकारितेची (journalism) सुरुवात नागपूर (Nagpur) येथून ‘लोकमत टाइम्स’पासून (Lokmat Times) केली त्यानंतर त्यांनी हिंदुस्तान टाइम्स (Hindustan Times) आणि मुंबईत डीएनए (DNA) या इंग्रजी दैनिकात (English daily) काम केले. त्यांची पर्यावरण (environment), खारपुटी रक्षण (mangrove) विषयामध्ये रुचि (interest) होती. काही काळ त्यांनी पर्याववरणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेसोबत (NGO) काम केले. उल्हास नदीतील (Ulhas river) औद्योगिक प्रदूषण (pollution) रोखण्यासाठी हरित लवादाकडे (green tribunal) पाठपुरावा करून एक खटला जिंकला त्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. गेल्या दीड-दोन वर्षापासून अश्विन यांचे ‘घनघोर’ नावाचे यू-ट्यूब चॅनलला चांगला प्रतिसाद मिळत होता. (Journalist)

काही दिवसांपूर्वी त्यांना पोटातील संसर्ग झाल्याने ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या शनिवारी सकाळी ८.३० ते १० वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंतिम ठाणे येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. (Journalist)

(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या निधीचे लाभार्थी केवळ भाजपचे दोनच खासदार)

अश्विन अघोर यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार गमावला : सुधीर मुनगंटीवार

“राष्ट्र प्रथम” हा विचार प्रखरपणे मांडणारे पत्रकार अश्विन अघोर यांचे अकाली निधन धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार आपण गमावला आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिवंगत पत्रकार अश्विन अघोर यांच्या निधनाबद्दल आपले दुःख व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणाले की त्यांच्या स्वभावात वैदर्भीय दिलखुलासपणा आणि मिश्किलपणा ठासून भरला होता. जीवनात यश मिळवतांना अनेक संकटांना त्यांनी खिलाडूपणे हसतमुखाने तोंड दिले. (Journalist)

अनेक वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनेल्समधील यशस्वी कारकिर्दीनंतर आपल्या “घनघौर” या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलवरून खऱ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या सत्याचा शोध अव्याहतपणे मांडणाऱ्या अश्विनजींच्या अकाली जाण्याने तयार झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील. आपल्या लिखाणातून आणि व्हिडियो वार्तापत्रातून मांडलेल्या विश्लेषणातून त्यांनी जनजागृतीचे मोठे कार्य सातत्याने केले. माध्यम क्षेत्रातील सद्य प्रलोभनांपासून दूर राहून वैचारिक पत्रकारितेचा एक आदर्श अश्विन अघोर यांनी उभा केला. राष्ट्रविरोधी नरेटिव्ह खोडून काढताना नवीन बदलत्या तंत्रज्ञानाचा अतिशय चांगला उपयोग त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात करून घेतला. पर्यावरण आणि जैवविविधतेचाही त्यांचा चांगला अभ्यास होता. ईश्वर त्यांना सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना तसेच मित्र परिवाराला या दुःखातून लवकर सावरण्याचे बळ देवो, असे सांगून सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी अश्विन अघोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. ॐ शांतिः ॥ (Journalist)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.