डोंगरीतील (Dongari) बाबा दर्ग्यात दोन आंतकवादी घुसले आहे, त्यांच्या हातात शस्त्रे असल्याचा निनावी कॉल करणाऱ्या ८४ वर्षीय वयोवृद्धाला शुक्रवारी डोंगरी पोलिसांनी अटक केली आहे. भगवान रामचंद्र भापकर उर्फ नजरूल इस्लाम शेख असे अटक करण्यात आलेल्या वयोवृद्धाचे नाव असून तो विक्रोळी टागोर नगर येथे राहणारा आहे. कॉल करण्यामागचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तात्काळ बाबा दर्गा येथे जाऊन तपासणी
दक्षिण मुंबईतील डोंगरी (Dongari) या ठिकाणी असलेल्या ‘बाबा दर्गा’ आहे. या दर्ग्यात एक महिला आणि एक पुरुष शस्त्र घेऊन घुसली आहे, या आशयाचा कॉल मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आला होता. नियंत्रण कक्षाकडून डोंगरी पोलिसांना सावध करण्यात आले होते, डोंगरी पोलिसांनी तात्काळ बाबा दर्गा येथे जाऊन तपासणी केली, तसेच परिसरात चौकशी केली असता असा कुठलाही अनोळखी महिला पुरुष दर्ग्यात आले नसल्याची महिती स्थानिकांनी दिली. पोलिसांनी संपूर्ण दर्गा शोधला परंतु कोणीही संशयित आढळून आले नाही. हा हॉक्स कॉल असल्याचे समोर आले.
(हेही वाचा MCGM : मुंबईत ७७ ठिकाणी सामुदायिक शौचालयांच्या बांधकामांना सुरुवात, पश्चिम उपनगरात गती संथ)
डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
डोंगरी (Dongari) पोलिसांनी कॉल कुठून व कोणी केला याचा शोध घेतला असता हा कॉल साफी मिल्क सेंटरच्या समोरील फुटपाथ, चारनळ पोलीस चौकीच्या मागे शफी मज्जिदच्या बाजूला, सामंत भाई नानजी मार्ग, डोंगरी येथील एका सार्वजनिक टेलिफोन बूथ येथून आला असल्याची माहिती समोर आली. पोलीस पथकाने सदर परिसरात व टेलिफोन बूथधारकाकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, एक वयोवृद्ध इसमाने याने सदरचा कॉल केला असून त्याच्या पायाला मार लागलेला आहे अशी माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या व्यक्तीच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासण्यात आले. या फुटेज वरून या व्यक्तीचा शोध घेऊन शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली. भगवान रामचंद्र भापकर उर्फ नजरूल इस्लाम शेख असे अटक करण्यात आलेल्या वयोवृद्धाचे नाव असून तो विक्रोळी टागोर नगर येथे राहणारा आहे. कॉल करण्यामागचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.