हल्द्वानीमध्ये हिंसाचार (Haldwani Violence) भडकवण्यामागे पाकिस्तानी टूलकिटचा सहभाग होता, असा धक्कादायक खुलासा झाला आहे. भारतीय गुप्तचर सुरक्षा संस्थांच्या तपासादरम्यान याचे पुरावे मिळाले आहेत. हल्द्वानीत झालेला हिंसाचार काही सोशल मीडिया अकाउंटद्वारे केल्या जाणाऱ्या चिथावणीखोर पोस्टचा परिणाम म्हणून येथे हिंसाचार भडकला होता. चौकशीत सर्व अकाउंट पाकिस्तानमधून हाताळले जात होते असे दिसले आहे. या संपूर्ण हिंसाचारात पाकिस्तान सहभागी असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने गृह मंत्रालयाला सोपवला आहे.
(हेही वाचा Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील म्हणतात, कुणबी आणि मागासवर्गीय आयोग दोन्हींचे आरक्षण मिळाले तर आनंदच)
चिथावणीखोर हॅशटॅग
जेव्हा हल्द्वानीत न्यायालयाने बनभूलपुरात अवैध पद्धतीने अतिक्रमण करून बांधलेला मदरसा पाडण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर पाकिस्तानने तेथे दंगल (Haldwani Violence) घडवण्याचा कट रचत पाकिस्तानी टूलकिट तयार केले. यासाठी मोहंमद अख्तर, आसिफ पॉलिटिक लेस, मोहंमद आलम, अरकाम, आलम शेख आणि आसिफ मन्सूरी यांच्या नावाने १० ट्विटर हँडल सक्रिय केले. या ट्विटर हँडल्सवर लोकांना चिथावणे सुरू केले. हल्द्वानीच्या घटनेनंतर त्वरित पाकिस्तानातून ९ हॅशटॅग सक्रिय करण्यात आले. हल्द्वानी घटनेनंतर पाकिस्तानच्या कराची, इस्लामाबाद, ऐबोटाबाद आणि लाहोरमधून त्वरित ९ हॅशटॅग सक्रिय झाल्याचे गुप्तचर संस्थांना हाती पुरावे लागले आहेत. त्यात हल्द्वानी बर्निंग, हल्द्वानी राइट्स, हल्द्वानी व्हायलन्सचा प्रयोग करून चिथावणीखोर पोस्ट ट्विट केल्या.
Join Our WhatsApp Community