Volkswagen Polo 2024 : फोक्सवॅगनची नवीन सेडान पोलो कार

फोक्सवॅगनची नवीन सेडान गाडी प्रशस्त आणि चालवण्याचा चांगला अनुभव देणारी.

482
Volkswagen Polo 2024 : फोक्सवॅगनची नवीन सेडान पोलो कार
Volkswagen Polo 2024 : फोक्सवॅगनची नवीन सेडान पोलो कार
  • ऋजुता लुकतुके

१९८१ पासून फोक्सवॅगन कंपनीने आपलं पोलो कारचं मॉडेल कायम ठेवलं आहे. त्यात सुधारणा झाल्या, आधुनिकता आली. पण, ब्रँड आणि नाव तेच राहिलं. गर्दीच्या रस्त्यांवर आटोपशीर पण, कार चालवण्याचा चांगला अनुभव देणारी आणि छोटी कार असून प्रशस्त असलेली कार अशी या कारची ओळख आहे. काळाबरोबरच ही कार जास्त आधुनिक होत गेली. आणि २०२४ मध्ये कंपनी पोलोचं नवीन सेडान मॉडेल आणण्याच्या प्रयत्नांत आहे.

आणि लाँचपूर्वीच त्याची चर्चा आहे. अपेक्षेप्रमाणेच नवीन पोलोही प्रशस्त आणि जास्त बूट स्पेस असलेली असेल. गाडीला पुढे आणि मागे नवीन स्टाईलचे बंपर आहेत. आणि एलईडी दिव्यांची एक माळच गाडीला बसवण्यात आली आहे. गाडीतील चालकाची सीट आणि समोरचं स्टिअरिंग व्हिल कन्सोल असं दोन्ही फिरतं असल्यामुळे चालकाची उंची आणि शरीरयष्टीप्रमाणे ते ॲडजस्ट करता येतं, ही या गाडीतील एक महत्त्वाची सोय आहे. अगदी सुरुवातीच्या मॉडेलपासूनच तुम्हाला मोठा इन्फोटेनमेंट डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, ॲपल कारप्ले तसंच अँड्रोईड कार-सपोर्ट या सुविधा मिळतात.

(हेही वाचा – Onion : कांदा निर्यातीवर बंदी म्हणून टोमॅटोच्या कंटेनरमधून कांद्याची निर्यात; सीमा शुल्क विभागाची कारवाई)

पर्यावरणाचा विचार करता यावेळी पोलो मॉडेलमध्ये फक्त पेट्रोल इंजिनच असेल. आणि १.० पेट्रोल क्षमतेचं हे इंजिन टर्बो चार्ज आणि ३ सिलिंडर असलेलं असेल. आणि यातून ९० अश्वशक्ती इतकी शक्ती निर्माण होऊ शकेल. रस्त्यावरील खड्डे आणि अडथळे यामुळे बसणारे धक्के या गाडीत कमी बसतात असा लोकांचा अनुभव आहे.

चालकाला सुरक्षेसाठी एअरबॅग सह ड्रायव्हिंग असिस्टन्स यंत्रणाही देण्यात आली आहे. शिवाय पाठीमागे बसवलेल्या कॅमेरांमुळे ही कार चालकाला पार्किंगसाठीही मदत करते. भारतात ही कार नेमकी कधी लाँच होणार हे कंपनीने अजून स्पष्ट केलेलं नाही. पण, तिची किंमत ही ८ लाख रुपयांपासून सुरू होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.