Honda CB1000R : होंडाची स्टायलिश निओ स्पोर्ट्स बाईक भारतात धावण्यासाठी तयार

अलीकडेच चीनमध्ये ही बाईक लाँच झाली आहे. आणि जुलै महिन्यात भारतात ती येऊ शकते.

334
Honda CB1000R : होंडाची स्टायलिश निओ स्पोर्ट्स बाईक भारतात धावण्यासाठी तयार
Honda CB1000R : होंडाची स्टायलिश निओ स्पोर्ट्स बाईक भारतात धावण्यासाठी तयार
  • ऋजुता लुकतुके

होंडाची सीबी१०००आर (Honda CB1000R) ही नेकेड स्ट्रीट बाईक लोकांच्या नजरा आपल्याकडे वळवण्यासाठी सज्ज झाली आहे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी चीनमध्ये ती पहिल्यांदा लाँच झाली. आणि त्यानंतर भारतासह आशियात भ्रमंतीसाठी ती सज्ज आहे. होंडाच्या निओ-स्पोर्ट्स कॅफे सीरिजमधील ही नवीन बाईक आहे. २०१७ मध्ये टोकयो इथं होंडा कंपनीने पहिल्यांदा ही संकल्पना सुरू केली. तरुणांना आकर्षित करतील अशा नेकेड स्पोर्ट्स बाईक या श्रेणीतून कंपनी आणत असते.

या बाईकचं स्टायलिंग हेच त्याचं वैशिष्टय आहे. गाडीची पेट्रोलच्या टाकीवर ॲल्युमिनिअम आवरण आहे. रेडिएटर आणि फेंडरलाही असाच ॲल्युमिनिअम लुक आहे.

(हेही वाचा – Volkswagen Polo 2024 : फोक्सवॅगनची नवीन सेडान पोलो कार)

अलीकडच्या सगळ्या बाईकमध्ये असतो तसा इथंही डिजिटल डिस्प्ले आहे. एबीएस प्रणाली आहे. आणि चार रायडिंग मोडचे पर्याय तुमच्यासमोर आहेत. या बाईकचं इंजिन ९९९ सीसी क्षमतेचं आहे. आणि यातून १४३ बीएचपी इतकी शक्ती निर्माण होऊ शकते. गाडीचा गिअर बॉक्स ६ स्पीड आहे. या बाईकची किंमत १५ लाख ते १६ लाख रुपयांच्या दरम्यान असेल.

आणि भारतात या बाईकची स्पर्धा असेल ती कावासाकी झेड१०००, बीएमडब्ल्यू मोटोराड एस, आणि ड्युकाटी स्ट्रीटफायटर व्ही४ या बाईकशी.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.