- ऋजुता लुकतुके
मलेशियात सुरू असलेल्या आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत प्रवेश नक्की केला आहे. आणि त्यामुळे या स्पर्धेत पहिल्यांदाच भारताला पदक मिळणार आहे. पदकाचा रंग अर्थातच बाद फेरीतील निकालांवरून ठरेल. चीनचं आव्हान ३-२ असं परतून लावल्यावर हाँग काँग विरुद्ध भारतीय महिला संघाने ३-० असा विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाचा बाद फेरीत प्रवेश नक्की झाला आणि पदकही. (Asian Badminton Championship)
पी व्ही सिंधू, अश्मिता चलिहा आणि दुहेरीची जोडी अश्विनी आणि तनिशा यांनी हे विजय भारताला मिळवून दिले. महत्त्वाचं म्हणजे दुखापतीनंतर ४ महिन्यांनी कोर्टवर परतलेल्या सिंधूला चांगला सूर गवसला आहे. (Asian Badminton Championship)
Indian women’s team secure their maiden medal at #BATC 🥹🫶
Proud of you girls, keep it up! 🚀@himantabiswa | @sanjay091968 | @lakhaniarun1 #BATC2024#TeamIndia#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/4KfpWjay2o
— BAI Media (@BAI_Media) February 16, 2024
(हेही वाचा – Fisker Ocean : फिस्कर ओशन ही अमेरिकन इलेक्ट्रिक कार भारतात लाँच होणार?)
उपांत्य फेरीत भारताची गाठ जपानशी
पहिल्या एकेरीच्या सामन्यात पी व्ही सिंधूचा मुकाबला हाँग काँगच्या नवख्या लो सिन यामशी होता. यामने सिंधूला चांगली लढत दिली. आणि हा सामना तीन गेमपर्यंत चालला. पण, अखेर अनुभवाच्या जोरावर सिंधूने लामवर २१-७, १६-२१ आणि २१-१२ अशी मात केली. तर पुढील सामना हा दुहेरीचा होता. यात अश्विनी पोनाप्पा आणि तनिशा कास्ट्रो या जोडीने यांग तिंग आणि यांग लाम या जोडीवर २१-१३ आणि २१-१२ अशी मात केली. खरंतर हाँग काँगची जोडी जागतिक क्रमवारीत १८ व्या स्थानावर आहे. पण, अश्विनी आणि तनिशाने त्यांना डोकं वर काढण्याचीच संधी दिली नाही. या दमदार विजयानंतर तिसरा सामना अश्मिता चलिहाला खेळायचा होता. (Asian Badminton Championship)
यांग सु लीचा २१-१३ आणि २१-१२ असा आरामात पराभव केला. भारतीय खेळाडूंनी ज्या आरामात विजय मिळवले त्यावर संघाबरोबर असलेले प्रशिक्षक विमल कुमार खुश होते. आता उपांत्य फेरीत भारताची गाठ जपानशी पडणार आहे. (Asian Badminton Championship)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community