Sharad Pawar : मला पवार कुटुंबात एकटे पाडले; अजित पवारांच्या वक्तव्यावर काय म्हणाले शरद पवार?

272

सध्या अजित पवार यांनी बारामतीत लक्ष केंद्रित केले आहे. या ठिकाणी थेट सुप्रिया सुळेंच्या विरोधात पर्याय देतांना त्यांनी स्वतःची पत्नी सुनेत्रा पवार यांनाच उभे करण्याचा मनसुबा आखला आहे. असा रीतीने बारामतीत नणंद विरोधात भावजई असा सामना रंगणार आहे. या एकूणच राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवार कुटुंबाने आपल्याला एकटे पाडले, असे वक्तव्य केले. त्यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी, ”आम्ही भावनात्मक आवाहन करण्याचे कारण नाही. बारामतीचे लोक आम्हाला वर्षानुवर्षं ओळखतात. त्यामुळे आम्हाला त्याची गरज नाही. पण ज्याप्रकारे यांच्याकडून भूमिका मांडली जात आहे त्यातून वेगळे सुचवले जात आहे. जनता त्यासंबंधी योग्य निर्णय येईल याची मला खात्री आहे’, असे म्हटले आहे.

सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न

दरम्यान अजित पवारांनी ‘आपल्याला एकटे पाडले जात असल्याचा आरोप केला आहे. त्यावर शरद पवार (Sharad Pawar)  म्हणाले की “निवडणुकीत मतदारांशी साथ जोडण्यासाठी त्यांनी हे केले असावे. पण कुटुंबातील सर्व लोक एका बाजूला आणि मीच एकटा सांगणे आहे सांगणे म्हणजे सतत भावनात्मक भूमिका मांडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न दिसत आहे”. मला अनेक कार्यकर्त्यांनी फोन येतात, दमदाटी केली जात आहे असे सांगितले जात आहे. बारामती मतदारसंघात पहिल्यांदाच अशा गोष्टी होत आहेत अशी खंतही शरद पवारांनी व्यक्त केली.

(हेही वाचा Shirur : महायुतीमध्ये शिरूर लोकसभेवरून रस्सीखेच…शिरुर लोकसभेच्या जागेवर महायुतीमधील तिन्ही पक्षांचा दावा)

पक्षाची भूमिका मांडणे त्यांचा अधिकार

जितेंद्र आव्हाडांनी पवार कुटुंबात फूट पाडल्याच्या धनंजय मुंडे यांच्या आरोपावर ते म्हणाले की, राष्ट्रवादीत त्यांचा जो कालखंड आहे त्यापेक्षा अधिक काळ जितेंद्र आव्हाड पक्षासाठी काम करत आहेत. त्यांनी देशतापळीवर काम केले आहे, देशातील तरुणांचे नेतृत्व केले. राज्य मंत्रिमंडळातही त्यांनी काम केले आहे. पक्षाची भूमिका मांडणे त्यांचा अधिकार आहे. त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली नाही. जितेंद्र आव्हाड यांनी काय बोलावे याचे मार्गदर्शन इतरांनी करण्याची गरज नाही, असेही शरद पवार म्हणाले.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.