- ऋजुता लुकतुके
पेटीएम पेमेंट्स बँकेच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी दोन महत्त्वाचे निर्णय जाहीर केलं. पेमेंट्स बँकेवर घातलेले निर्बंध आता आधीच्या २९ फेब्रुवारी या तारखे ऐवजी १५ दिवस नंतर म्हणजे १५ मार्चपासून सुरू होणार आहेत. तसंच पेटीएमवरील सर्व आर्थिक व्यवहारांसाठी आता ॲक्सिस बँक सेटलमेंटचं काम करणार आहे. हे दोन्ही निर्णय हे पेटीएमसाठी नाही तर ही सेवा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक आहेत. (Paytm Crisis)
यापूर्वी पेटीएम ही युपीआय सेवा किंवा पेटीएम क्युआर, साऊंडबॉक्स आणि कार्डमशीन या सेवा जरी वापरायच्या झाल्या तरी मध्यस्थीचं किंवा व्यवहार पार पाडण्याचं काम पेटीएम पेमेंट्स बँक करत होती. आणि ही बँक २९ फेब्रुवारीला नवीन ठेवी स्वीकारणार नाही म्हटल्यावर पुढे काय हा प्रश्न पेटीएम कंपनीसमोर होता. त्यातच क्युआर, साऊंडबॉक्स आणि कार्डमशीन या सेवा १ मार्चनंतरही सुरू राहणार आहेत. त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. पण, पेमेंट्स बँक शिवाय हे व्यवहारही पार पडू शकत नव्हते. ती सोय आता ॲक्सिस बँकेनं केली आहे. (Paytm Crisis)
(हेही वाचा – Kamal Nath : काँग्रेसला अजून एक धक्का; कमलनाथ भाजपात प्रवेश करणार ?)
यावरील बंदी आता १५ मार्चनंतर लागू
त्यामुळे तुमचं क्युआर, साऊंडबॉक्स आणि कार्डमशीन मधील खातं पेमेंट्स बँक सोडून इतर कुठल्याही बँक खात्याशी जोडलेलं असेल तरी ते सुरळीत सुरू राहील. याशिवाय रिझर्व्ह बँकेनं १६ फेब्रुवारीला पेटीएमविषयी लोकांच्या मनात असलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी ३० प्रश्नांना उत्तरं देणारी एक एफएक्यू मालिकाही जारी केली आहे. मध्यवर्ती बँकेनं केलेल्या कारवाईमुळे ग्राहकांचं कुठलंही नुकसान होणार नाही, असं त्यांनी आवर्जून सांगितलं आहे. आणि पेटीएम पेमेंट्स बँकेत सध्या जमा असलेल्या ठेवी ग्राहकांना कधीही काढून घेता येतील, असंही बँकेनं स्पष्ट केलं आहे. (Paytm Crisis)
३१ जानेवारीला रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई करताना नवीन मुदतठेवी किंवा ठेवी स्वीकारण्यावर बंदी घातली होती. आधी २९ फेब्रुवारीपासून असलेली ही बंदी आता १५ मार्चनंतर लागू होणार आहे. पेटीएम पेमेंट्स बँक तसंच पेटीएम वॉलेट आणि फास्टटॅग अशा कुठल्याही वॉलेटमध्ये नवीन पैसे जमा करता येणार नाहीएत. (Paytm Crisis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community