CM Eknath Shinde : बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यांनी आधी आरसा बघावा

आता संपूर्ण महाराष्ट्र माझे कुटूंब आहे. माझं कुटूंब माझं घर असं माझं नाही. माझे कार्यकर्ते आणि राज्याची जनता माझे टॅानिक आहे. हीच लोकं माझे कवच कुंडले आहेत

235
CM Eknath Shinde : बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यांनी आधी आरसा बघावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आहे. आज म्हणजेच शनिवार १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी कोल्हापूर येथून आपल्या प्रचाराची सुरुवात केली आहे. आज कोल्हापूर येथे शिवसेनेचे महाअधिवेशन भरवण्यात आले आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यांनी पहिल्यांदा आरसा पहावा” अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

(हेही वाचा – Kamal Nath : काँग्रेसला अजून एक धक्का; कमलनाथ भाजपात प्रवेश करणार ?)

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?

वारसा सांगणाऱ्यांनी पहिल्यांदा आरसा पहावा, बाळासाहेबांचा वारसा सांगण्यासाठी तोंडात नारा, मनगटात मेहनत असावी लागते.शिवसेनेसाठी अनेकांनी घरावर तुळसीपत्र ठेवले, आणि हे आले पीठावर आयत्या रेगोट्या मारायल, पण त्या सुद्धा त्यांना नीट मारता आल्या नाहीत. नुसत्या दोन चार टकल्यांना सोबत घेवून पक्ष मोठा होत नाही. आपली लोकं मोठी होत होती हे त्यांना नको होते. ते एकमेकांना झुंजवत होते, अशी टीका त्यांनी (CM Eknath Shinde) केली.

मी कोणाच्याच धमकीला घाबरत नाही –

मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) पुढे म्हणाले की; जेव्हा मी गडचिरोलीत काम करत होतो, तेव्हा पोलिस बोलले आपल्याला मायनिंगचे काम करता येणार नाही. मी बोललो नक्षलवाद मोठे की सरकार मोठे? कारखाना चालू केला. त्यामुळे १० हजार लोकांना रोजगार मिळाला. आणखी प्रोजेक्टवर विचार सुरु आहे. ज्यामुळे हजारो रोजगार मिळतील. मी कधीच कोणाला घाबरत नाही. दाऊद आला शकील आला पण मी कोणाच्याच धमकीला घाबरत नाही.

(हेही वाचा – Liquor Policy Scam Case : मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढ)

हिंदूहृदयसम्राट बोलायला तुमची जीभ का कचरते?

शिवसेनेचे हिंदूत्व व्यापक आहे. आता हिंदूहृदयसम्राट बोलायला तुमची जीभ का कचरते? काँग्रेसला लांब ठेवायला बाळासाहेब बोलले होते, पण हे तर काँग्रेसला मांडीवर घेवून बसले आहेत. शिवसेना वाचवण्यासाठी हे धाडस आम्ही केले. शिवसैनिकांचे खच्चीकरण होवू लागले, त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले. मी मनमोकळेपणाने सर्व सोडले असते. मी (CM Eknath Shinde) कधीही कोणते पद मागितलं नाही.

(हेही वाचा – Eknath Shinde : सुडाचे राजकारण करणारा नेता असतो का? असा सवाल करत शिंदेंनी ठाकरेंवर साधला निशाणा)

माझे कार्यकर्ते आणि राज्याची जनता माझे टॅानिक –

आता संपूर्ण महाराष्ट्र माझे (CM Eknath Shinde) कुटूंब आहे. माझं कुटूंब माझं घर असं माझं नाही. माझे कार्यकर्ते आणि राज्याची जनता माझे टॅानिक आहे. हीच लोकं माझे कवच कुंडले आहेत, मारने वाले से बडा बचानावाला होता है, असेही ते (CM Eknath Shinde) म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.