- ऋजुता लुकतुके
झी एंटरटेनमेंट कंपनीबरोबरचा करार मोडला असला तरी सोनी पिक्चर्स कंपनीला भारतीय मनोरंजन बाजारपेठेकडून मोठी आशा आहे. आणि आता स्वतंत्रपणे गुंतवणूक करण्याची तयारी सोनी कंपनीने ठेवली आहे. कंपनीचे कार्यकारी वित्त प्रमुख हिरोकी तोतोकी यांनी सोनी कंपनीचे मनसुबे स्पष्ट केले आहेत. भारतीय बाजारपेठेत टिकून राहण्याचीच सोनीची इच्छा आहे. (Sony India Expansion Plans)
‘दीर्घ मुदतीत पाहिलं, तर भारतीय बाजारपेठेत आम्हाला चांगली संधी आहे. इथं विस्ताराच्या संधी कंपनीला शोधायच्या आहेत. आघीसारखी संधी मिळाली तर आम्ही तिच्यावर विचार करू. नाहीतर आम्ही स्वतंत्रपणे इथं गुंतवणूक करू,’ असं तोतोकी मीडियाशी बोलताना म्हणाले. (Sony India Expansion Plans)
(हेही वाचा – Pune Municipality: पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प २० फेब्रुवारीला जाहीर)
सोनी पिक्चर्स कंपनीच्या भारतात इतक्या वाहिन्या
आधीच्या सोनी आणि झी दरम्यानच्या करारात सोनी कंपनी भारतात दीड अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणार होती. पण, आता कंपनी या गुंतवणुकीसाठी बांधील नाहीए. पण, स्वतंत्रपणे गुंतवणुकीच्या संधी नक्की शोधल्या जाणार आहेत. सोनी पिक्चर्स कंपनीच्या भारतात २६ वाहिन्या आहेत. सेटमॅक्स या ब्रँड अंतर्गत हिंदी आणि प्रादेशिक भाषेतील या वाहिन्यांचे ७०० दशलक्ष प्रेक्षक आहेत. (Sony India Expansion Plans)
ओटीटी व्यासपीठावरही कंपनीचा सोनी लिव हे ॲप अस्तित्वात आहे. ऑनलाईन व्यासपीठावर कंपनीचे ३३ दशलक्ष प्रेक्षक आहेत. आणि लाईव्ह स्पोर्ट्स, मनोरंजनाचे कार्यक्रम, चित्रपट, लघुपट आणि रियालिटी शो अशा कार्यक्रमांची रेलचेल आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीची भारतातातील उलाढाल ६६८४ कोटी रुपयांची होती. आता भारतात कंपनीची नवीन रणनीती तयार नसली तरी टप्प्या टप्प्याने नवीन गुंतवणूक करण्याची तयारी सोनी पिक्चर्सनी दाखवली आहे. (Sony India Expansion Plans)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community