Asian Badminton Championship : भारतीय महिलांची ऐतिहासिक कामगिरी, अंतिम फेरीत प्रवेश

अनमोल खरबने ऐन मोक्याच्या क्षणी मोलाचा विजय मिळवला. 

229
Asian Badminton Championship : भारतीय महिलांची ऐतिहासिक कामगिरी, अंतिम फेरीत प्रवेश
  • ऋजुता लुकतुके

आशियाई सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिलांनी इतिहास घडवला आहे. मलेशियात सुरू असलेल्या स्पर्धेत जपानचा ३-२ असा पराभव करत भारतीय संघाने पहिल्यांदाच स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यामुळे महिलांचं किमान रौप्य पदक निश्चित झालं आहे. (Asian Badminton Championship)

भारताकडून अश्मिता चलिहा, अनमोल खरब आणि त्रिशा, गायत्री या दुहेरीच्या जोडीने आपापले सामने जिंकले. तर सिंधू आणि अश्विनी, सिंधू या दुहेरी जोडीचा पराभव झाला. नवोदित खेळाडूंनी मिळवलेल्या विजयामुळे या कामगिरीचं मोल अधिक आहे. (Asian Badminton Championship)

शनिवारी उपांत्य लढतीला सुरुवात झाली ती पी व्ही सिंधू आणि आया धोरी यांच्यातील सामन्याने. सिंधू कालच दमलेली वाटत होती. त्यातच धोरी विरुद्ध तिला लय सापडला नाही. आणि तिने १७-२१ आणि २०-२२ असा पहिला सामना गमावला. वेगात आणि अचूकतेत सिंधू तिच्यापेक्षा तरुण खेळाडूपेक्षा कमी पडली. (Asian Badminton Championship)

(हेही वाचा – Fire: नवी मुंबईतील केमिकल फॅक्टरीला भीषण आग)

त्यानंतर त्रिशा आणि गायत्रीने मात्र भारताला दुहेरीच्या पहिल्या लढतीत विजय मिळवून दिला. आणि १-१ अशी बरोबरीही साधून दिली. जपानच्या मात्सुयामा आणि शिडा या अव्वल जोडीचा त्यांनी तीन गेममध्ये २१-१७, १६-२१ आणि २२-२० असा पराभव केला. (Asian Badminton Championship)

अश्मिता चलिहाने एकेरीच्या दुसऱ्या लढतीत जपानची माजी नंबर वन खेळाडू ओकुहाराला २१-१७ आणि २१-१४ असं आरामात हरवलं. आणि भारताला २-१ अशी आघाडीही मिळवून दिली. पण, अश्विनी पोनप्पा आणि पी व्ही सिंधू या अनुभवी जोडीचा दुसऱ्या दुहेरीत पराभव झाला. दोघींनी अर्ध्या तासात १४-२१ आणि ११-२४ अशी ही लढत गमावली. (Asian Badminton Championship)

२-२ अशा बरोबरीनंतर सगळ्यांचं लक्ष अनमोल खरब आणि नात्सुकी निदारा यांच्यात होती. १७ वर्षीय अनमोलवर ही मोठीच जबाबदारी होती. पण, तिने डोकं शांत ठेवून खेळ केला. आणि सामन्यात विजय मिळवण्याबरोबरच भारतीय संघाला अंतिम फेरी गाठून दिली. आता अंतिम फेरीत भारताचा मुकाबला थायलंडशी होणार आहे. (Asian Badminton Championship)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.