Atal Setu: मॅरेथॉनमुळे अटल सेतू १० तासांसाठी बंद, अत्यावश्यक वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध; वाचा सविस्तर

पुण्यात द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरून येणारी वाहने गव्हाण फाटामार्गे बेलापूर-वाशी-मुंबई अशी वळवण्यात येणार आहेत.

291
Atal Setu: मॅरेथॉनमुळे अटल सेतू १० तासांसाठी बंद, अत्यावश्यक वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध; वाचा सविस्तर
Atal Setu: मॅरेथॉनमुळे अटल सेतू १० तासांसाठी बंद, अत्यावश्यक वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध; वाचा सविस्तर

मुंबईतील अटल बिहारी वाजपेयी सागरी (Atal Bihari Vajpayee Sea Bridge) अटल सेतू (Atal Setu) तब्बल १० तासांकरिता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. रविवारी मॅरेथॉन होत असल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

(हेही वाचा – Om Birla : पुढील २५ वर्षांत ज्ञानाच्या बळावर भारत जगाचे नेतृत्व करेल )

नागरिकांचं आकर्षण ठरलेल्या मुंबईतील अटल सेतूवर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे अटल सेतूवरून शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत, अशी एकूण १० तासांसाठी वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक वाहनांना सूट देण्यात आली असून इतर वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुण्यात द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरून येणारी वाहने गव्हाण फाटामार्गे बेलापूर-वाशी-मुंबई अशी वळवण्यात येणार आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.