BMC : मुंबईत २५ हजार भटक्या श्वानांपासून रेबीजची भीती नाही, कारण काय ते वाचा

रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी महानगरपालिकेच्या वतीने जॅनीसी स्मिथ ऍनिमल वेल्फेअर ट्रस्ट, यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ऍनिमल्स, यूनिव्हर्सल ऍनिमल वेल्फेअर सोसायटी आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे.

737
World Rabies Day : भटक्या श्वानांचे २८ सप्टेंबर २०२४ पासून अँटी रेबीज लसीकरण

भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे माणसांना होणाऱ्या संक्रमणाचा धोका कमी करणे तसेच श्वानांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने ‘मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प’ अंतर्गत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी निरंतर अभियान हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत विविध संस्थांच्या साहाय्याने मुंबईतील किमान ७० टक्के श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या पैकी आतापर्यंत २५ हजार श्वानांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. प्राणी कल्याण करणे व त्यासोबतच प्राण्यांपासून मानवामध्ये होणारे संक्रमण टाळण्यासाठी महानगरपालिकेचे (BMC) आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. (BMC)

याबाबत तपशिलवार माहिती देताना पशुवैद्यकीय विभाग आणि देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले की, भटक्या श्वानांच्या लसीकरणाच्या माध्यमातून वेगवेगळी उद्दिष्टे साध्य करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. विशेषतः रेबीजची लागण टाळून मानवी मृत्यू रोखणे, रेबीज विषाणूच्या प्रसाराचे चक्र तोडणे व त्याद्वारे भटक्या श्वानांच्या चाव्यामार्फत होणाऱ्या रेबीजच्या मानवी संक्रमणाचा धोका कमी करणे, प्राणी कल्याण संरक्षण करणे, रेबीजचा प्रसार कमी करून नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आदी उद्दिष्टे महत्त्वाची आहेत. (BMC)

(हेही वाचा – Atal Setu: मॅरेथॉनमुळे अटल सेतू १० तासांसाठी बंद, अत्यावश्यक वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध; वाचा सविस्तर)

नागरिकांचे सहकार्य अतिशय महत्वाचे

याच धर्तीवर, सप्टेंबर २०२३ पासून महानगरपालिकेच्या (BMC) पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने ‘मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प’ अंर्तगत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी निरंतर अभियान हाती घेण्यात आले आहे. हे अभियान अविरतपणे सुरू आहे. सन २०१४ च्या गणनेनुसार, मुंबईत भटक्या श्वानांची संख्या सुमारे ९५ हजार इतकी आहे. त्यापैकी सुमारे २५ हजार भटक्या श्वानांचे सप्टेंबर २०२३ पासून आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहेत. तर, मार्च २०२४ च्या शेवटपर्यंत सुमारे ७० टक्के श्वानांचे लसीकरण करण्यात येणार आहे. (BMC)

रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी महानगरपालिकेच्या (BMC) वतीने जॅनीसी स्मिथ ऍनिमल वेल्फेअर ट्रस्ट, यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ऍनिमल्स, यूनिव्हर्सल ऍनिमल वेल्फेअर सोसायटी आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांतील प्रशिक्षित पशुवैद्यकीय तज्ञांच्या साहाय्याने हे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे. महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या निरंतर अभियानामध्ये नागरिकांचे सहकार्य अतिशय महत्वाचे ठरणार आहे. नागरिकांनी आपल्या भागातील भटक्या श्वानांची माहिती द्यावी तसेच लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.