केंद्र सरकार आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (EIB) यांच्यात शुक्रवार 7 मे रोजी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी, 150 दशलक्ष युरोंच्या वित्तीय करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन कार्यक्रमात या स्वाक्ष-या करण्यात आल्या आहेत. पोर्तुगालचे परराष्ट्र व्यवहार आणि सहकार्य मंत्री फ्रान्सिस्को आंद्रे आणि EIBचे अध्यक्ष वेर्नेर होयेर यांच्या उपस्थितीत हा करार झाला. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव के राजारामन यांनी भारत सरकारच्या वतीने या करारावर स्वाक्षरी केली. तर EIB चे उपाध्यक्ष क्रिस्तियन केटल थॉमसन यांनी EIBच्या वतीने स्वाक्षरी केली.
प्रदूषण मुक्त वाहतूक व्यवस्थेचा उद्देश
EIB ने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 600 दक्षलक्ष युरोंचे कर्ज मंजूर केले आहे. पहिल्या टप्प्यासाठी 200 दशलक्ष युरोंचा वित्तीय करार 22 जुलै 2019 रोजी करण्यात आला होता. या प्रकल्पाचा उद्देश, पुण्यासारख्या घनदाट लोकवस्तीच्या आणि वाहतूक कोंडीची गंभीर समस्या असलेल्या शहरात एक कार्यक्षम, सुरक्षित,किफायतशीत आणि प्रदूषण मुक्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवणे हा आहे.
केंद्र सरकार आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (EIB) यांच्यात पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 150 दक्षलक्ष युरोंच्या वित्तीय करारावर स्वाक्षऱ्या
📕https://t.co/puEjgD1iTD pic.twitter.com/Y1cBNBT68r
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) May 7, 2021
(हेही वाचाः जंबो कोविड सेंटरचे कंत्राट मर्जीतील कंत्राटदारांना देण्याचा घाट! भाजपचा आरोप)
वाहतुकीचे सहज आणि स्वस्त साधन उपलब्ध होणार
EIB च्या वित्तपुरवठ्यामुळे मेट्रोच्या मार्गिका-एक (उत्तर-दक्षिण) पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट आणि मार्गिका-दोन (पश्चिम-पूर्व) वनाज (कोथरूड) ते रामवाडी अशा दोन्ही म्हणजेच सुमारे 31.25 किमी मार्गाचे मेट्रो काम पूर्ण होऊ शकेल. तसेच मेट्रोचे कोचेस देखील यातून खरेदी करता येतील. त्याशिवाय, या प्रकल्पामुळे पुणे शहरातल्या नोकरदारांनाही वाहतुकीचे सहज आणि स्वस्त साधन उपलब्ध होईल. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे महामंडळ लिमिटेड या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे.
Join Our WhatsApp Community🏦@EIB च्या वित्तपुरवठ्यामुळे मेट्रोच्या मार्गिका-एक (उत्तर-दक्षिण) –पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) ते स्वारगेट आणि
मार्गिका-दोन (पश्चिम-पूर्व) वनाज (कोथरूड) ते रामवाडी अशा दोन्ही म्हणजेच सुमारे 31.25 किमी मार्गाचे मेट्रो काम पूर्ण होऊ शकेल pic.twitter.com/zT6HXn1ARR
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) May 7, 2021