मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून (Pune Division of Central Railway) पुणे-मिरज मार्गावर (Pune-Miraj route) तारगाव-मसूर-शिरवडे (Targaon-Masoor-Shirwade) या स्थानकांदरम्यान लोहमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सुरू झाला असून, तो २२ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. रेल्वेच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, अनेक गाड्या विलंबाने धावणार आहेत. कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस २० व २१ फेब्रुवारीला रद्द राहील. पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस २१ व २३ फेब्रुवारीला रद्द राहणार आहे.
कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस आणि मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस या गाड्या २२ फेब्रुवारीला धावणार नाहीत. कोल्हापूर-सातारा ही गाडी २१ व २२ फेब्रुवारीला कराडपर्यंत धावेल. ही गाडी कराड-सातारा दरम्यान रद्द राहील. सातारा-कोल्हापूर ही गाडी २१ व २२ फेब्रुवारीला कराडपासून धावेल. ही गाडी सातारा- कराड दरम्यान रद्द राहील. पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस २१ व २२ फेब्रुवारीला सातारापर्यंत धावेल. ही गाडी सातारा-कोल्हापूर दरम्यान रद्द राहील.
(हेही वाचा – Manoj Jarange : मराठा समाजाने मुंबई-आग्रा महामार्ग अडवल्यानंतर जरांगे यांनी दिला कार्यकर्त्यांना महत्वाचा सल्ला; म्हणाले … )
कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस २१ व २२ फेब्रुवारीला सातारा येथून पुण्यासाठी सोडण्यात येईल. ही गाडी कोल्हापूर-सातारा दरम्यान रद्द राहील. गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस २१ फेब्रुवारीला पुण्यापर्यंत धावेल. ही गाडी पुणे-कोल्हापूर दरम्यान रद्द राहील. कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस २२ फेब्रुवारीला पुण्यातून सुटेल. ही गाडी कोल्हापूर-पुणे दरम्यान रद्द राहील.
हेही पहा –